शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
3
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
4
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
5
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
6
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
7
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
8
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
9
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
10
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
11
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
12
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
13
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
14
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
15
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
17
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
18
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
19
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
20
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांनी जाणली विकासाची माहिती

By admin | Updated: July 20, 2015 01:47 IST

स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात शनिवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

धानोरा येथे आढावा बैठक : विस्तार अधिकाऱ्यांच्या बोगस दौऱ्यांबाबत चौकशीचे दिले निर्देश
धानोरा : स्थानिक पंचायत समितीच्या सभागृहात शनिवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी तालुक्याच्या विकासाबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. त्याचबरोबर आवश्यक त्या सूचनाही अधिकाऱ्यांना केल्या.
आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते होते. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती कल्पना वड्डे, पुष्पा गाडगे, ताराबाई कोटांगले, शशिकांत साळवे, रेखा डोळस, विजय साळवे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मानद सचिव अनंत साळवे, नायब तहसीलदार मडावी, संवर्ग विकास अधिकारी पांडुरंग कोल्हे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आढावा बैठकीदरम्यान खासदार अशोक नेते यांनी तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांविषयी अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. धानोरा तालुक्यात एकूण २६९ बालके कुपोषीत असल्याची माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी दिली. तालुक्यात १५९ अंगणवाड्या व १३६ मिनी अंगणवाड्या असून या अंगणवाड्यांच्या माध्यमातून नियमितपणे पोषण आहार उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती दिली.
धानोरा-गोडलवाही-मिचगाव (झाडा) ही बस पुढे पेंढरीपर्यंत नेण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली. यावेळी खासदार अशोक नेते यांनी अशा प्रकारचे निर्देश एसटी महामंडळाला दिले. गरजू शेतकऱ्यांना बैलबंडीचे वाटप करावे, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. या भागातील शिक्षण विस्तार अधिकारी बोगस दौरे दाखवित असल्याची बाब काही लोकप्रतिनिधींनी खासदारांच्या लक्षात आणून दिली. या विस्तार अधिकाऱ्यांची चौकशी केली जाईल, असे आश्वासन खासदारांनी दिले. धानोरा येथील ग्रामीण रूग्णालयाचे बांधकाम निकृष्ठ दर्जाचे करण्यात आल्याने इमारतीतून पावसाळ्यात पाणी गळते. परिणामी सदर इमारत रिकामीच ठेवण्यात आली आहे.
दुर्गम भागातील गावांना वीज पुरवठा करण्यासाठी वीज वितरण कंपनीने खांब उभे करून ठेवले आहेत. मात्र या खांबांना अजुनपर्यंत तार जोडून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. परिणामी गावकऱ्यांना अंधारातच राहावे लागत आहे. सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊ शकले नाही. आभार सहायक संवर्ग विकास अधिकारी कुळसंगे यांनी मानले.(तालुका प्रतिनिधी)
रिक्त पदे भरण्याबाबत खासदारांना साकडे
धानोरा तालुक्याला लागलेले रिक्त पदांचे ग्रहण अजुनही कायम आहे. रिक्त पदांमुळे शासनाच्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यास उशीर होत आहे. याचा त्रास नागरिकांना होत आहे. अनेक विकास कामे अर्धवट आहेत. परिणामी शासनाचा कोट्यवधी रूपयांचा निधी वापस जात आहे.
ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक व अधिकाऱ्यांची तसेच इतर कर्मचऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. विद्युत मंडळातही लाईनमनची पदे रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्याला प्राधन्य देण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी खासदारांकडे केली.