शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींचे जीवनमान उंचावण्यासाठी ‘मानव विकास’मधून मोहफूल प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 05:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक मोहफुलांचे उत्पादन होते. मोहफूल हे या भागातील आदिवासी कुटुंबाच्या उपजीविकेचे हे एक साधन आहे. राज्य शासनाने नुकतेच मोहफुलांवरील निर्बंध हटविले आहेत. मोहफुलाचे आदिवासीबांधवांच्या जीवनातील महत्त्व ओळखून आदिवासी विकासमंत्री पाडवी, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती आणि शबरी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांच्या पुढाकाराने मानव विकास कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. 

ठळक मुद्दे३.३६ कोटींच्या निधीस मंजुरी, गडचिरोली जिल्ह्यासाठी राज्य शासनाचा विशेष उपक्रम

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांचे राहणीमान व जीवनमान उंचावण्यासाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत ‘मोहफूल - आदिवासी उपजीविकेचे एक साधन’ हा प्रकल्प राबविण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील वन धन केंद्रामार्फत शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ हा प्रकल्प राबविणार आहे. आदिवासी कुटुंबांचे सशक्तीकरण होऊन ते आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी हा प्रकल्प आदिवासी विकासमंत्री ॲड. के.सी. पाडवी यांच्या पुढाकारातून राबविला जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक मोहफुलांचे उत्पादन होते. मोहफूल हे या भागातील आदिवासी कुटुंबाच्या उपजीविकेचे हे एक साधन आहे. राज्य शासनाने नुकतेच मोहफुलांवरील निर्बंध हटविले आहेत. मोहफुलाचे आदिवासीबांधवांच्या जीवनातील महत्त्व ओळखून आदिवासी विकासमंत्री पाडवी, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती आणि शबरी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांच्या पुढाकाराने मानव विकास कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मोहफुलाचे झाड हे आदिवासी बांधवांसाठी कल्पवृक्ष आहे. मोहफुलांच्या माध्यमातून आदिवासी कुटुंबाचे आर्थिक सक्षमीकरण होऊ शकते. या प्रकल्पाच्या माध्यमातून मोहफूल प्रक्रिया उद्योग सुरू झाल्यास आदिवासी संस्थांचा व त्या भागाचाही विकास होईल, तसेच आदिवासी बांधवांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावेल, असा विश्वास ना. पाडवी यांनी व्यक्त केला. 

...अशी आहे योजनाया योजनेत जिल्ह्यातील १५ वनधन  केंद्र/ग्राम संघांना मोहफूल खरेदी करून सामूहिक विक्री करण्यासाठी प्रतिकेंद्र १० लाख रुपयांचे खेळते भांडवल देण्यात येणार आहे. वनधन केंद्रातील आदिवासी कुटुंबाला मोहफूल संकलनासाठी लागणारे जाळी, ताडपत्री, प्लास्टिक कॅरेट हे साहित्य खरेदीसाठी ३०० आदिवासी कुटुंबाला प्रतिकुटुंब २ हजार रुपये याप्रमाणे निधी देण्यात येणार आहे, तसेच ग्रामीण भागातून मोहफूल खरेदी करून त्याची वाहतूक करणे व शीतगृहात साठवणूक करण्यासाठी वनधन केंद्र/ ग्राम संघातील सदस्यांना डीबीटीद्वारे अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे. याबरोबरच मोहआधारित प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री खरेदीसाठी प्रत्येक वनधन केंद्रांना ५ लाख रुपये इतका निधी मिळणार आहे. 

निधीत ९० टक्के हिस्सा शासनाचा

या प्रकल्पासाठी राज्य शासनाने आपल्या वाट्याच्या 

रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. 

यात १० टक्के हिस्सा लाभार्थी किंवा आदिवासी समाज किंवा संस्था यांचा राहणार आहे. 

हा प्रकल्प राबविण्यापूर्वी त्याचे आधारभूत सर्वेक्षण करण्यात येणार असून, प्रकल्प संपल्यानंतर त्याच्या फलनिष्पत्तीचे मूल्यमापन करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना