मोडस्के ते वटेली रस्त्याचे काम वळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:38 IST2021-02-11T04:38:33+5:302021-02-11T04:38:33+5:30

शासनाने मोडस्के ते वटेली या मार्गाला मान्यता दिली, परंतु अभियंता व कंत्राटदारांनी स्वत:च्या मताने मोडस्के ते वटेली या मार्गाचे ...

Modske diverted the road work from Vateli | मोडस्के ते वटेली रस्त्याचे काम वळविले

मोडस्के ते वटेली रस्त्याचे काम वळविले

शासनाने मोडस्के ते वटेली या मार्गाला मान्यता दिली, परंतु अभियंता व कंत्राटदारांनी स्वत:च्या मताने मोडस्के ते वटेली या मार्गाचे काम न करता वटेली ते दोडुर या मार्गाचे काम सुरू केले. याबाबत ग्रामस्थांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे रस्त्याच्या कामाची चाैकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्य बेबी लेकामी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

काेट......

तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आपण स्वत: या रस्त्याची पाहणी केली. सदर काम ज्या मार्गाचे आहे त्याच मार्गावर सुरू आहे. वटेलीपासून कामाची सुरुवात केली आहे. मार्ग बदलण्यात आला नाही.

- व्ही. टी. जुआरे, प्रभारी उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग, एटापल्ली.

Web Title: Modske diverted the road work from Vateli