शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

मेळावा, समाधान शिबिरातून योजनांचा प्रसार

By admin | Updated: January 24, 2016 01:37 IST

पोलीस ठाणे, देसाईगंजच्या वतीने उसेगाव व भामरागड तहसील कार्यालयाच्या वतीने लाहेरी येथे जनजागरण मेळावा व समाधान शिबिर आयोजित करून ..

लाहेरी, उसेगाव (चक) येथे कार्यक्रमाचे आयोजन : पोलीस व महसूल प्रशासनाचा पुढाकारदेसाईगंज/ लाहेरी : पोलीस ठाणे, देसाईगंजच्या वतीने उसेगाव व भामरागड तहसील कार्यालयाच्या वतीने लाहेरी येथे जनजागरण मेळावा व समाधान शिबिर आयोजित करून या भागातील नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती गुरूवारी देण्यात आली. शासकीय योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन उपस्थितांना करण्यात आले. देसाईगंज पोलीस ठाण्याच्या वतीने उसेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणावर गुरूवारी आयोजित जनजागरण मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील होते. प्रमुख अतिथी म्हणून कुरूडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गहाणे, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, तालुका काँग्रेस अध्यक्ष विलास ढोरे, शिवराजपुरचे सरपंच मारोती बगमारे, पोलीस पाटील नमिता जुमनाके, शालू ंदंडवते उपस्थित होत्या. मेळाव्यादरम्यान विविध शासकीय विभागांच्या वतीने स्टॉल लावून योजनांची माहिती देण्यात आली. नाट्यकलावंत हिरालाल पेंटर, मारोतराव बुल्ले यांनी लोकनाट्यातून जनजागृती केली. दरम्यान व्हॉलिबॉल, रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या. संचालन बोदेले, राजू पुराम तर आभार मांडवे यांनी केले. भामरागड तहसील कार्यालयाच्या वतीने लाहेरी येथे गुरूवारी समाधान शिबिराचे उद्घाटन भामरागडचे नगराध्यक्ष राजू वड्डे यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी तहसीलदार अरूण येरचे होते. यावेळी नायब तहसीलदार स्वामी डोंगरे, सहाय्यक संवर्ग विकास अधिकारी काळबांधे, उपपोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आशिष ठाकूर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नीलेश मेश्राम, महावितरणचे पाटील, पुरवठा निरीक्षक भांडारवार, कृषी विस्तार अधिकारी पदा, सुधाकर तिम्मा, सुरेश सिडाम, लक्ष्मीकांत बोगामी, बाबुराव पिपरे, शामराव येरकलवार, कुमरे, म्हशाखेत्री, घाटे उपस्थित होते. शिबिरात ४९ रहिवासी दाखले, ४७ जन्माचे दाखले, ६३ जमिनीचे दाखले, ९३ शिधापत्रिका, ८४ उत्पन्नाचे दाखले, १ धनादेश, १ स्प्रेपंप, १ इलेक्ट्रिक पंप, ३६ सातबारा, ११८ नमुना ८ अ अशा प्रकारचे विविध दाखले वितरित करून विविध योजनांचे अर्ज भरून घेण्यात आले. १४ रूग्णांची तपासणी करून रुग्णांना औषधीही वितरित करण्यात आली. (वार्ताहर)