शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आगीत साहित्य जळाले

By admin | Updated: February 4, 2016 01:28 IST

स्थानिक आंबेडकर वॉर्डातील परित्यक्त्या महिला कौशल्या गोवर्धन सिडाम यांच्या झोपडीला मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत

देसाईगंजच्या आंबेडकर वॉर्डातील घटना : तांदळाच्या डब्यात ठेवलेली रक्कमही खाकदेसाईगंज : स्थानिक आंबेडकर वॉर्डातील परित्यक्त्या महिला कौशल्या गोवर्धन सिडाम यांच्या झोपडीला मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या. स्वयंपाकघरात ही आग लागल्याने अन्नधान्यही पूर्णपणे जळून खाक झाले आहे. आंबेडकर वॉर्डात कौशल्य गोवर्धन सिडाम ही परित्यक्त्या महिला आपल्या मुली व नातवंडासोबत झोपडीत राहते. दोन्ही मायलेकी बांबूच्या टोपल्या तयार करून त्या विकण्यासोबत मोलमजुरीचे काम करून कुटुंबाचा उदनिर्वाह चालवितात. मंगळवारी देसाईगंज येथे स्थानिक नगराध्यक्षांचे लग्न असल्याने कौशल्या संपूर्ण कुटुुंबासह लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. दरम्यान त्यांच्या घरातील स्वयंपाक घरात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत संपूर्ण अन्नधान्य व घरातील कपडेही जळून खाक झाले. शेजाऱ्यांनी समोरचा दरवाजा तोडून घरातील काही सामान काढले. सामान बाहेर काढतपर्यंत बहुतांशी सामान आगीच्या विळख्यात सापडून भस्मसात झाले. रात्री नगर पालिकेच्या अग्निशमन यंत्रणेला याची सूचना करण्यात आली. त्यांनी आगीवर तत्काळ नियंत्रण मिळविले. कौशल्याबाई आपल्या मजुरीची रक्कम चोरीला जाऊ नये म्हणून तांदळाच्या डब्यात ठेवत होत्या. तीही आगीत स्वाहा झाली आहे. याबाबत तहसीलदार अजय चरडे यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच पंचनामा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. शासनाकडून निकषानुसार आवश्यक मदत देण्यासंदर्भात कारवाई केली जाईल. (वार्ताहर)