शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
5
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
6
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
7
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
8
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
9
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
10
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
11
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
13
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
14
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
15
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
16
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
17
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
18
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
19
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
20
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
Daily Top 2Weekly Top 5

मार्र्कं डा होणार हागणदारीमुक्त

By admin | Updated: September 24, 2014 23:35 IST

विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेले मार्कंडादेव हे गाव हागणदारीमुक्त करण्याचा निर्णय महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या सोमवारी पार पडलेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला.

दारूविक्रीलाही बंदी : तंटामुक्त समितीच्या सभेत ठरावमार्र्कं डादेव : विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेले मार्कंडादेव हे गाव हागणदारीमुक्त करण्याचा निर्णय महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या सोमवारी पार पडलेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला. तंटामुक्त समितीची सभा ग्रामपंचायत भवनात पार पडली. यावेळी गावाच्या विकासाबाबत विविध ठराव घेण्यात आले. मागील काही महिन्यांपासून मार्कंडादेव येथे खुलेआम दारूची विक्री केली जात आहे. गावातच दारू मिळत असल्याने गावातील लहान मुले, युवकसुद्धा दारूच्या आहारी गेले आहेत. दिवसभर काम केलेल्या मजुरीतील बराचसा पैसा केवळ दारूवर खर्च होत असल्याने अनेक कुटुंब आर्थिक संकटात सापडली आहेत. दारूमुळे गावाची शांतता धोक्यात आली आहे. संपूर्ण देशात मार्कंडादेव हे गाव विदर्भाची काशी म्हणून ओळख आहे. मात्र गावात सुरू असलेली अवैध दारूविक्री ही अत्यंत लाजीरवाणी बाब असल्याचे लक्षात आल्यानंतर तंटामुक्त समितीने अवैध दारूविक्रीच्या विरोधात कडक पावले उचलली आहेत. यामध्ये जो व्यक्ती दारू विकतांना आढळून आल्यास त्याच्यावर ३ हजार ५०१ रूपयांचे दंड ठोठावण्यात येईल, त्याचबरोबर दारूविक्रीसंदर्भात माहिती देणाऱ्यास २५१ रूपयांचे बक्षीस देण्यात येईल. त्याचबरोबर दारू पिऊन येणाऱ्या नागरिक किंवा भाविकास मार्कंडादेव गावामध्ये प्रवेशबंदी केली जाणार असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला. मार्कंडादेव गाव हागणदारीमुक्त करण्याच्या उद्देशानेसुद्धा या सभेतसुद्धा चर्चा करण्यात आली. उघड्यावर शौचास केल्यामुळे अनेक रोगांचा प्रसार होतो. त्याचबरोबर महिलांचे आरोग्यसुद्धा बिघण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर शौचास करू नये याबाबत अनेकदा बजाविण्यात आले असले तरी याचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे बाहेर शौचास बसणाऱ्या व्यक्तीकडून ५०० रूपयांचा दंड वसूल केल्या जाईल, असा निर्णय घेण्यात आला. सभेला अध्यक्षस्थानी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रकाश आभारे, सरपंच ललिता मरसकोल्हे, उपसरपंच सेविकांत आभारे, ग्रामपंचायत सदस्य राजू शेंडे, योगीता मरसकोल्हे, ग्रामसेवक सराटे, मुख्याध्यापक शेंडे, प्रा. संतोष सुरपाम, थामदेव आत्राम, सुरेश बंडावार, मधुकर झाडे, मधू कुलसंगे, विठाबाई गेडाम, भगवान शेंडे, रमेश कोडापे, नारायण राऊत, पोलीस पाटील परमात्मा शेंडे, एकनाथ कुनघाडकर, विठ्ठल सरपे, देवानंद सुरपाम आदी उपस्थित होते. पहिल्यांदाच तंटामुक्त समितीने दारू विक्रेत्यांवर आर्थिक दंड ठोठाविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गावात दारूविक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत. या दोनही निर्णयांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्धार सदस्यांनी केला आहे. (वार्ताहर)