अनेक धान खरेदी केंद्र अजूनही बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 06:00 IST2020-02-03T06:00:00+5:302020-02-03T06:00:28+5:30

धान खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून कधी गोदाम पूर्ण तर कधी बारदान्याचा तुटवडा या विविध कारणांमुळे सदर केंद्र बंद पडले होते. त्यामुळे पाहिजे, त्या प्रमाणात धान खरेदीला गती आली नाही. शासकीय धान खरेदी केंद्राची मुदत ३१ मार्चपर्यंत राहते. त्यानंतर धान खरेदी केंद्र बंद केले जाणार आहेत. आजपर्यंत केवळ ३० ते ४० टक्केच धानाची विक्री झाली आहे.

Many paddy shopping centers are still closed | अनेक धान खरेदी केंद्र अजूनही बंदच

अनेक धान खरेदी केंद्र अजूनही बंदच

ठळक मुद्देसमस्या गंभीर : कोरेगावातील गोदाम फुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील जिल्हा मार्केटींग फेडरेशनचे दोन व आदिवासी विकास महामंडळाचा एक असे एकूण तिन्ही धान खरेदी केंद्र आहेत. यातील दोन खरेदी केंद्र बंद पडले आहेत.
देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव येथे जिल्हा मार्केटींग फेडरेशनचे याच वर्षी धान खरेदी केंद्र सुरू झाले आहे. मात्र भरडाईचे कंत्राट असलेल्या राईसमिलधारकांनी धान्याची उचल केली नाही. त्यामुळे गोदाम पूर्ण फुल्ल भरले आहे. धान खरेदी केंद्र सुरू झाल्यापासून कधी गोदाम पूर्ण तर कधी बारदान्याचा तुटवडा या विविध कारणांमुळे सदर केंद्र बंद पडले होते. त्यामुळे पाहिजे, त्या प्रमाणात धान खरेदीला गती आली नाही. शासकीय धान खरेदी केंद्राची मुदत ३१ मार्चपर्यंत राहते. त्यानंतर धान खरेदी केंद्र बंद केले जाणार आहेत. आजपर्यंत केवळ ३० ते ४० टक्केच धानाची विक्री झाली आहे. अनेक शेतकऱ्यांकडे धान पडून आहे. जे मिलधारक गतीने मिलिंग करीत नाही, अशांकडील परवाना काढून घेऊन तो दुसºया मिलधारकांना द्यावा. कोणत्याही परिस्थितीत धान केंद्र चार दिवसात सुरू करावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

जारांवडी केंद्रावर बारदान्याचा अभाव
एटापल्ली : जारावंडी येथील धान खरेदी केंद्रावर बारदाना नसल्याने २५ जानेवारीपासून या केंद्रावरील धान खरेदी पूर्णपणे ठप्प पडली आहे. जारावंडी केंद्राच्या सभोवतालच्या २५ गावातील शेतकरी या केंद्रावर धानाची विक्री करतात. दुर्गम भागात व्यापारी धान खरेदी करीत नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना शासकीय खरेदी केंद्रावरच धानाची विक्री करावे लागते. बारदाना उपलब्ध करावा, अशी मागणी आहे.

Web Title: Many paddy shopping centers are still closed