शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

सिराेंचात एकाच कुटुंबातील अनेक सदस्य बिनविराेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:30 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क सिराेंचा : सिराेंचा तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दुर्गम भागातील अनेक ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

सिराेंचा : सिराेंचा तालुक्यातील ३० ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दुर्गम भागातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये एका जागेसाठी एकच नामांकन प्राप्त झाले. तसेच काही ग्रामपंचायतीमध्ये एकाच कुटुंबातील दाेन ते तीन सदस्य बिनविराेध निवडून आले आहेत. मद्दिकुंठा ग्रामपंचायत ही सात सदस्यीय ग्रामंचायत आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये एका जागेसाठी व प्रभाग क्रमांक ३ मध्ये एका जागेसाठी एकाच कुटुंबातील दाेन सख्या भावांनी नामांकन दाखल केले. त्याच्याविराेधात एकही नामांकन दाखल झाला नाही. प्रभाग क्रमांक १ मध्ये एका जागेसाठी बेलनकाेंडा लसमय्या रामय्या यांनी तर प्रभाग क्रमांक ३ मध्ये बेलनकाेंडा पाेचालू रामय्या यांनी नामांकन दाखल केले आहे. त्याच्याच नात्यातील चुलत भावाच्या मुलीने सुध्दा प्रभाग क्रमांक १ मध्ये नामांकन दाखल केले. तिचे नाव इकमला सरीता मधुकर आहे. तिन्ही ठिकाणी एकच नामांकन दाखल झाल्याने या सर्वांची अविराेध निवड झाली आहे.

लक्ष्मीदेवीपेठा ग्रामपंचायतीत प्रभाग क्रमांक ३ मध्ये अनुसूचित जाती राखीव गटातून शानगाेंडा व्यंकटेश्वर चंद्रय्या यांनी तर अनुसूचित जमाती महिला राखीव गटातून त्यांच्या पत्नी शानगाेंडा लक्ष्मी व्यंकटेश्वर यांनी नामांकन दाखल केले आहे. त्यांच्या विराेधात नामांकन नसल्याने त्यांची अविराेध निवड झाली आहे. दुर्गम भागातील नागरिकांकडे जातवैधता प्रमाणपत्र नाही. तसेच राजकारणात त्यांना फारसा रस नाही. त्यामुळे निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करीत नसल्याने अनेक प्रभागांमध्ये अविराेध निवड हाेते.

बाॅक्स

४७ जागा बिनविराेध

मद्दिकुंठा ग्रामपंचायतीत ५ जागा, रामंजापूर ग्रामपंचायतीत ७, काेपेला ७, काेलामार्का ७, आरडा ५, सुंकरअली ४, लक्ष्मीदेवीपेठा २, सिरकाेंडा माल १, टेकडामाेटला १, विठ्ठलरावपेठा २, नरसिंहापल्ली १, रमेशगुडम ३, पातागुडम २, गाेल्लागुडम ग्रामपंचायतीत एका जागेसाठी केवळ एकच नामांकन दाखल झाले आहे. रामंजापूर, काेपेला व काेर्लामाल या तिन्ही ग्रामपंचायती सात सदस्यीय असून या ग्रामपंचायतींच्या सर्वच जागांची निवडणूक बिनविराेध झाली आहे.