रंग खेळताना खोलीत नेऊन केले कृत्य; अनाथ आठ वर्षीय चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 12:32 IST2026-03-10T12:31:17+5:302026-03-10T12:32:09+5:30

Gadchiroli : रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळत असताना एका ८ वर्षीय चिमुकलीला घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार कोरची तालुक्यात घडला.

Man rapes orphaned eight-year-old girl while she was playing with paints | रंग खेळताना खोलीत नेऊन केले कृत्य; अनाथ आठ वर्षीय चिमुकलीवर नराधमाचा अत्याचार

Man rapes orphaned eight-year-old girl while she was playing with paints

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची (गडचिरोली) :
रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळत असताना एका ८ वर्षीय चिमुकलीला घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार कोरची तालुक्यात घडला. ही दुर्दैवी घटना तब्बल पाच दिवसांनी समोर आली असून, कोरची पोलिसांनी आरोपी मोनुकुमार ढेक (२२) या नराधमाला रविवार, ८ मार्च रोजी बेड्या ठोकल्या.

पीडित चिमुरडी अनाथ असून, तिचा सांभाळ तिचे मामा-मामी अत्यंत मायेने करत आहेत. होळीच्या दिवशी गावात सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना, आरोपीने या निरागस बालिकेला फूस लावून स्वतःच्या घरात नेले.

रक्ताच्या नात्यातील असलेल्या या २२ वर्षीय तरुणाने तिथे तिच्या असहायतेचा फायदा घेत, तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नाही, तर हा प्रकार कोणाला सांगितला, तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन तिचे तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. 

अंघोळ घालताना घटनेला वाचा

घटनेनंतर पाच दिवसांनी, म्हणजेच रविवार, ८ मार्च रोजी, मामी मुलीला अंघोळ घालत असताना तिच्या पोटावर सूज दिसून आली. मामीने प्रेमाने विचारणा केली असता, चिमुकलीने तिच्यावर ओढवलेली आपबीती सांगितली. हे ऐकताच कुटुंबीयांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यानंतर, कोरची पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. मुलीला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३ दिवसांची पोलिस कोठडी

घटनेची माहिती मिळताच, कोरची पोलिसांनी वेगाने हालचाली करत, नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, आरोपीवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ८ रोजी पोलिसांनी जेरबंद केले, ९ रोजी न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली, अशी माहिती पो.नि. शैलेंद्र ठाकरे यांनी दिली. उपनिरीक्षक योगेश पवार तपास करत आहेत.

Web Title : होली पर अत्याचार: कोरची में नाबालिग लड़की से दुष्कर्म; आरोपी गिरफ्तार

Web Summary : कोरची में एक जघन्य अपराध हुआ: आठ वर्षीय अनाथ लड़की को घर में बहला-फुसलाकर ले जाया गया और यौन उत्पीड़न किया गया। आरोपी, मोनुकुमार ढेक, 22, को लड़की द्वारा नहाते समय अपनी चाची को हमले का खुलासा करने के बाद गिरफ्तार किया गया है। वह अब पुलिस हिरासत में है।

Web Title : Horror During Holi: Minor Girl Assaulted in Korchi; Accused Arrested

Web Summary : A heinous crime occurred in Korchi: an eight-year-old orphan girl was sexually assaulted after being lured into a house. The accused, Monukumar Dhek, 22, has been arrested after the girl disclosed the assault to her aunt while bathing. He is now in police custody.