शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:37 IST2021-04-20T04:37:42+5:302021-04-20T04:37:42+5:30

मुख्यालयी राहण्यासाठी कर्मचाऱ्यांना शासन दरमहा घरभाडेभत्ता देते. मात्र, हे घरभाडे उचलूनही परिसरातील बहुतांश शासकीय कर्मचारी मुख्यालयी न राहता ये-जा ...

Make it compulsory for government employees to stay at the headquarters | शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करा

शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करा

मुख्यालयी राहण्यासाठी कर्मचाऱ्यांना शासन दरमहा घरभाडेभत्ता देते. मात्र, हे घरभाडे उचलूनही परिसरातील बहुतांश शासकीय कर्मचारी मुख्यालयी न राहता ये-जा करतात. परिसरात जवळपास २५ शासकीय शाळा आहेत. ६ ते ७ ग्रामपंचायती आहेत. आणि तलाठी सजे, दवाखाने व इतर शासकीय व निमशासकीय कार्यालये आहेत. यातील ९० टक्के कर्मचारी थेट जिल्हा व तालुका मुख्यालयातून ये-जा करतात. जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक गडचिरोली, एटापल्ली, अहेरी व आलापल्लीवरून ये-जा करून गावामध्ये गृहभेटी देतात. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुख्यालयात राहणे सक्तीचे करावे किंवा घरूनच कर्तव्य बजावण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी जारावंडी ग्रामपंचायतीचे सदस्य मुकेश कावळे, लक्ष्मी कुमरे, अन्नपूर्णा मोहुर्ले, संदीप येनगंटीवार, रतन इष्टाम, मुकुंदा सिडाम, प्रकाश चन्नेवार व गावातील नागरिकांनी ग्रामसेवक व सरपंचांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

===Photopath===

190421\19gad_1_19042021_30.jpg

===Caption===

ग्रामसेवकांना निवेदन देताना पदाधिकारी.

Web Title: Make it compulsory for government employees to stay at the headquarters