शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

Maharashtra Election 2019 ; आघाडी-युतीत सहकारी पक्ष बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 6:00 AM

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांमिळून तयार झालेली ‘महायुती’ आणि काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षांमिळून तयार झालेली ...

ठळक मुद्देपोस्टर-पॉम्प्लेटपुरतेच स्थान : स्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाच प्रचाराच्या जबाबदाऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांमिळून तयार झालेली ‘महायुती’ आणि काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्रपक्षांमिळून तयार झालेली ‘महाआघाडी’ यांच्यातच खऱ्या अर्थाने निवडणुकीचा महासंग्राम लढल्या जात आहे. परंतू जिल्ह्याच्या तीनही मतदार संघात महायुती किंवा महाआघाडी नावालाच असून प्रत्यक्षात प्रचारात युती-आघाडीतील मित्रपक्ष बेदखल झाले असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. त्यामुळे ज्या पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत त्याच पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर प्रचाराच्या सर्व जबाबदाºया दिल्या जात आहे.भाजप-सेनेच्या महायुतीत रिपाइं (आठवले), शिवसंग्राम पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांती संघटना हे पक्ष आहेत. त्यापैकी रिपाइं (आठवले) वगळता इतर पक्षांचे गडचिरोली जिल्ह्यातील अस्तित्व नगण्य आहे. मात्र रिपाइं (आठवले)च्या नेत्यांनाही प्रचारात फारसे महत्व मिळताना दिसत नाही.काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत पिरिपा, आरपीआय (कवाडे गट), भाकपा, शेकाप या पक्षांचा समावेश आहे. पण गडचिरोली आणि अहेरी मतदार संघात शेकापने वेगळी चूल मांडली आहे. आरमोरीत भाकपा तर अहेरीत राष्ट्रवादी काँग्रेस हे आघाडीतील पक्ष स्वतंत्रपणे लढत आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या तीनही मतदार संघात महाआघाडीतील पक्षांची फाटाफूट झाली आहे. एकमेव शिल्लक असलेल्या रिपाइं (कवाडे) गटाला पक्षात फारसे मानाचे स्थान मिळताना दिसत नाही. त्यामुळे दोन्हीकडील बहुतांश सहकारी पक्ष बेदखल झाले आहेत. स्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना घेऊन आघाडी व युतीचे उमेदवार प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.राष्ट्रवादीचे नेते येणार का?जिल्ह्यात भाजपने पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या दोन सभा झाल्या. इतर नेत्यांच्या सभांचे नियोजन सुरू आहे. पण काँग्रेसकडून अद्याप कोणीही मोठ्या नेत्याच्या सभा झालेल्या नाही. कोण स्टार प्रचारक येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याशिवाय राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील एकमेव उमेदवार असलेले धर्मरावबाबा आत्राम हे आपला गड एकाकीपणे लढवत असून कोणी मोठ्या नेत्याची सभा होण्याची शक्यता नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.गेडाम यांची अटक टळणार की, जामीन नाकारणार? आज निर्णयमाजी आमदार आणि आरमोरी मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार आनंदराव गेडाम व त्यांच्या पुत्राकडून एका अपक्ष उमेदवाराच्या अपहरण प्रकरणाचे पडसाद निवडणुकीत पडत आहे. त्यांच्या अटकेची मागणी तक्रारकर्त्याकडून करण्यात आली मात्र १३ पैकी अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही. सर्वजण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान गेडाम यांच्या अटकपूर्व जामिनाबाबत सोमवारी न्यायालयाकडून निर्णय होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :gadchiroli-acगडचिरोली