शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

चौडमपल्ली शाळेचे रूप पालटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2016 01:27 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्ह्यातील जि. प. शाळांमध्ये होत असतानाच चामोर्शी

गुणवत्ताही वाढली : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शाळेत रंगरंगोटीसह सुविधाआष्टी : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी जिल्ह्यातील जि. प. शाळांमध्ये होत असतानाच चामोर्शी तालुक्यातील चौडमपल्ली जि. प. शाळाही यात मागे राहिली नाही. तर या कार्यक्रमांतर्गत सर्व उपक्रमांची अंमलबजावणी शाळेत करण्यात आल्याने शाळेत रंगरंगोटी होऊन शैक्षणिक गुणवत्तेतही वाढ झाली आहे. त्यामुळे रस्त्याने ये- जा करणाऱ्यांचे लक्ष शाळा वेधून घेत आहे. चौडमपल्ली येथे १९६० मध्ये खासगी शाळा भरत होती. त्यावेळी इयत्ता पहिली ते सात वर्ग होते. दूरवरून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत होते. मात्र २००६ मध्ये ही शाळा बंद पडल्याने आजुबाजुच्या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठिण ठरले. जिल्हा परिषद व ग्रामस्थांच्या पुढाकाराने २८ सप्टेंबर २००६ पासून येथे जि. प. शाळा सुरू झाली. सुरूवातीला इयत्ता पहिली ते तिसरीपर्यंत येथे वर्ग सुरू करण्यात आले. येथे ३२ विद्यार्थी शिक्षण घेत होते. त्यावेळी ही शाळा चौडमपल्ली येथील बालसदनात भरत होती. पुढे २००७ मध्ये चौथा वर्ग सुरू करण्यात आला. याच काळात २००७-०८ मध्ये येथे दोन वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यात आले. २००६ ते २०१३ पर्यंत प्रदीप आकिनवार यांनी मुख्याध्यापक म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांच्याच काळात शाळेचे बांधकाम करण्यात आले. २०१३ मध्ये मुख्याध्यापिका म्हणून तोटावार रूजू झाल्या. सध्या त्या या शाळेच्या कार्यभार सांभाळत आहेत. त्यानंतर २०१४ मध्ये पाचवा वर्ग सुरू करण्यात आला. सध्या येथे एकूण ३५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दोन शिक्षिका अध्यापनाचे कार्य करीत आहेत. शाळेच्या दोन्ही बाजुला षटकोनी वर्गखोल्या आहेत. शिवाय किचनशेड बांधण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना खेळण्यास आवारात खुली जागा आहे. त्यामुळे येथे शैक्षणिक वातावरण आहे व शाळा आदर्श शाळा म्हणून नावलौकिकास आली आहे. (प्रतिनिधी)४ लाख ९५ हजारांतून संरक्षक भिंतजि. प. च्या माध्यमातून प्राप्त झालेल्या ४ लाख ९५ हजार रूपयांच्या निधीतून संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात आले. त्याबरोबरच वर्गखोल्यातील भिंतींवर वर्णाक्षरे, दैैनंदिन परिपाठ, मराठी महिने, अन्नसाखळी, कोष्टके, लांबीची एकके, पक्ष्यांची ओळख, बेटी बचाओ, दातांची निगा, पर्यावरणाचे रक्षण आदीसंबंधी चित्रे रेखाटली आहे.