शरीर सुदृढ असेल तरच जीवनाचा आनंद घेता येताे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:35 IST2021-03-25T04:35:32+5:302021-03-25T04:35:32+5:30

कासवी येथे व्यायामशाळा व वाचनालयाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. कासवी येथे २२ मार्च रोजी सुसज्ज वाचनालय व अत्याधुनिक सुविधा ...

Life can be enjoyed only if the body is healthy | शरीर सुदृढ असेल तरच जीवनाचा आनंद घेता येताे

शरीर सुदृढ असेल तरच जीवनाचा आनंद घेता येताे

कासवी येथे व्यायामशाळा व वाचनालयाच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. कासवी येथे २२ मार्च रोजी सुसज्ज वाचनालय व अत्याधुनिक सुविधा असलेली व्यायामशाळा युवकांसाठी मोफत सुरू करण्यात आली. जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी प्रथमच कासवी या गावात कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून खास उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. कृष्णा गजबे हाेते. यावेळी तहसीलदार कल्याणकुमार डहाट, नंदू नाकतोडे, पत्रकार प्रवीण राहाटे, कासवी येथील महादेव पारधी उपस्थित हाेते. सुदृढ आराेग्यासाठी व्यायाम एक सर्वोत्तम गुरूमंत्र आहे. व्यायामामुळे आपल्या शरीराची कार्यक्षमता व क्रियाशक्ती वाढते. त्याचबरोबर राेग प्रतिकारशक्ती देखील वाढते. देशातील प्रत्येक कुटुंब स्वास्थ्य व निरोगी असेल तर नक्कीच देशाची आर्थिक स्थिती देखील सुधारू शकेल. त्यासाठी व्यायाम हा स्वास्थ्याच्या रक्षणाचा उत्तम मंत्र आहे, असे प्रतिपादन आ. कृष्णा गजबे यांनी अध्यक्षस्थानावरून केले. व्यायामशाळेचे बांधकाम जिल्हा क्रीडा विभाग आणि निसर्ग बहुउद्देशिय सामाजिक संस्था यांच्या संयुक्त माध्यमातून पार पडले. तसेच कासवी येथील स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती आणि इतर परीक्षेच्या तयारी करणाऱ्या युवकांसाठी मोफत वाचनालय सुरू करण्यासाठी नंदू नाकतोडे यांनी पुढाकार घेतला.

बाॅक्स

वाचनालयासाठी पारधी यांनी दिली जागाा

स्पर्धा परीक्षा आणि इतर परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांना आपल्या गावातच मोफत सर्व सुविधा मिळाव्या आणि बाहेरगावी त्यांची आर्थिक हेळसांड होऊ नये यासाठी कासवी येथील प्रतिष्ठित नागरिक महादेव पारधी यांनी स्वमालकीच्या जागेवर युवकांसाठी मोफत वाचनालय सुरू केले.

भविष्यात केवळ कासवी येथेच नाही तर तालुक्यातील इतर गावात सुद्धा युवकांसाठी मोफत वाचनालय आणि व्यायामशाळा सुरू करण्याची इच्छा नंदू नाकतोडे यांनी जिल्हाधिकारी आणि आमदार यांच्यासमोर व्यक्त केली. जिल्हाधिकारी सिंगला यांनी आ. गजबे यांच्या कामात मदत करण्याची ग्वाही दिली.

Web Title: Life can be enjoyed only if the body is healthy