शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मॅटनर्सरीचे धडे

By admin | Updated: July 19, 2014 23:55 IST

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व तालुका कृषी अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील मारकबोडी येथे शेतकरी पुरूष बचतगटाला यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड

गडचिरोली : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व तालुका कृषी अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील मारकबोडी येथे शेतकरी पुरूष बचतगटाला यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड करण्यासाठी मॅटनर्सरीचे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी मारकबोडी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी मॅटनर्सरीचे धडे गिरविले.जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड करण्यासाठी पुरूष शेतकरी बचतगटाला यंत्र पुरविण्यात आले. या शेतकरी बचतगटाला आत्मा व कृषी कार्यालयाच्या तज्ज्ञांनी प्रात्यक्षिकासह मॅटनर्सरीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक गौतम जांभुळकर यांनी यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड करण्यासाठी मॅटनर्सरी कशी तयार करावी, याची प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती दिली. यावेळी ते म्हणाले, १ एकर क्षेत्रासाठी १२ मीटर रूंदीचे व १० मीटर लांबीचे २ बेड तयार करावे, त्यासाठी प्रथम रोेपवाटीकेतील जमीन समपातळीत आणावी, दोन बेडमध्ये पाणी निघून जाण्यासाठी अंतर असावे, रोपवाटीकेसाठी वापरावयाच्या मातीत कंपोस्ट व गांडूळ खत मिसळवावे, माती व खताच्या मिश्रणामध्ये कोणत्याही परिस्थितीत लहान, मोठे दगड नसावे, यंत्रामध्ये दगड अडकल्यास रोवणी कामाचा खोळंबा होऊ शकतो, असेही जांभुळ यांनी यावेळी सांगितले. कृषी विज्ञान केंद्र सोनापूरचे डॉ. प्रशांत सोळुंखे यांनी भात लागवड पद्धतीबाबत उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, समपातळीत तयार केलेल्या बेडवर पॉलिथीन कागद अंतरून त्यावर लोखंडी फ्रेमच्या सहाय्याने खतमिश्रीत मातीचा चिखल पसरवावा, यासाठी २१ बाय २५ सेमी, बाय २ सेमी आकाराची फ्रेम वापरावी. या पॉलिथीन कागदावर मातीचे चौकोनी आकाराचे केक तयार होतील, एकरी १५ ते २० किलो बियाणे वापरावे, असे सांगितले. तयार केलेल्या मातीच्या केकवर मोड आलेले बियाणे अलगदपणे पसरवावे, या बियाणांवर तणीस पसरवावी, सुरूवातीस या बियाण्याला दिवसातून दोन ते तीन वेळा झारीच्या सहाय्याने पाणी द्यावे, चार-पाच दिवसानंतर बियाणे उगविलेले दिसतात. त्यानंतर झाकलेली तणीस काढून टाकावी, १२ ते १५ सेमी उंचीचे रोपे मशीनच्या सहाय्याने लागवडीसाठी तयार होतात. त्यानंतर यंत्राच्या सहाय्याने रोवणी करावी, असेही सोळुंखे यावेळी म्हणाले. याप्रसंगी नोजेंद्र लांडगे यांनी भात रोवणी यंत्राची वैशिष्टे व काळजी याबाबत माहिती दिली. यावेळी परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)