शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

बंदेच्या संस्थेने मृत विद्यार्थ्याच्या नावावर लाटली शिष्यवृत्ती

By admin | Updated: March 12, 2015 01:54 IST

ज्या सावित्रीबाई फुले यांनी मुला-मुलींच्या शिक्षणासाठी यातना सहन केल्या. त्यांच्या नावावर शिक्षण संस्था चालविणाऱ्या संस्थाचालक अमित बंदे याने ...

गडचिरोली : ज्या सावित्रीबाई फुले यांनी मुला-मुलींच्या शिक्षणासाठी यातना सहन केल्या. त्यांच्या नावावर शिक्षण संस्था चालविणाऱ्या संस्थाचालक अमित बंदे याने सावित्रीबाई फुले इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट अ‍ॅन्ड टेक्नॉलाजी या संस्थेत मृत विद्यार्थ्याच्या नावावर ३५ हजार रूपयांची शिष्यवृत्ती उचल केल्याचा प्रकार पोलीस तपासात उघड झाला आहे. अशा संस्थाचालकांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आता विद्यार्थी संघटना सरसावल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यात गाजत असलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्यात दररोज नवी माहिती उजेडात येत आहे. जिल्ह्यातील २५ शिक्षण संस्थांच्या कागदपत्रांची तपासणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सुरू केली आहे. अनेक गावात जाऊनही विद्यार्थ्यांच्या नावाची पडताळणी पोलीस पथक करीत आहे. बहुतांशी शिक्षण संस्थाचालकांनी मृत व्यक्तीला विद्यार्थी दाखवून त्यांच्या नावाने शिष्यवृत्ती उचलल्याची बाबही पुढे आली आहे. गडचिरोलीतील सावित्रीबाई फुले इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट अ‍ॅन्ड टेक्नॉलाजीमध्ये चंदू तुकाराम नैताम या विद्यार्थ्याचा प्रवेश २०१३-१४ या वर्षात डिप्लोमा इन कॉम्प्युटर ग्रॉफिक्स या अभ्यासक्रमात दाखविण्यात आला. तसेच त्याच्या नावाने ३५ हजार रूपयांची शिष्यवृत्ती काढण्यात आली. मात्र या मुलाचा मृत्यू २१ नोव्हेंबर २०१२ रोजी अपघातात झाला असतानाही त्याची गुणपत्रिका व शाळा सोडल्याचे बनावट प्रमाणपत्र तसेच उत्पन्नाचा दाखला व जातीचे प्रमाणपत्र तयार करून त्याचा प्रवेश अमित बंदे या संस्थाचालकाने आपल्या संस्थेत दाखविला व त्याच्या नावावर २०१४ मध्ये शिष्यवृत्ती उचलली.केवळ चंदू नैताम याच मृत व्यक्तीच्या नावावर नाही, तर अशा अनेक मृत व्यक्तींना आपल्या महाविद्यालयात विद्यार्थी म्हणून बहुसंख्य संस्थाचालकांनी दाखविले आहे, असे तपास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. चंदू नैताम याचे मृत्यू प्रमाणपत्र दाखविल्यानंतरही संस्थाचालक गैरव्यवहार झाल्याचे मान्य करीत नव्हते. या व्यक्तीचा प्रवेश दाखविताना त्याच्या नावाचे महाविद्यालयाचे ओळखपत्रही तयार करण्यात आले. मृतक चंदू नैताम या विद्यार्थ्याच्या ओळखपत्रावर प्राचार्यांची स्वाक्षरी आहे. पोलीस तपासात या सर्वबाबी तपासण्यात आल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)