शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी आणि युतीमध्ये धास्तीच अधिक

By admin | Updated: September 17, 2014 23:49 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात सध्या महायुती व आघाडीमध्ये राज्यस्तरावरील घडामोडीमुळे धास्तीची भावना आहे. शिवसेना, भाजपमध्ये युती होते किंवा नाही, याची स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या राजकारणात सध्या महायुती व आघाडीमध्ये राज्यस्तरावरील घडामोडीमुळे धास्तीची भावना आहे. शिवसेना, भाजपमध्ये युती होते किंवा नाही, याची स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही चर्चा आहे. दोघांनीही वेगळी चूल मांडल्यास त्यादृष्टीने नियोजन करावे लागेल, असा सूर उमटत आहे. तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही आघाडीवरून राज्यपातळीवर धुसपूस सुरू आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढण्यासाठी तयारीत आहे. तसाही पक्षाने चामोर्शी येथे काँग्रेसच्या वाट्यातील मतदार संघात मेळावा घेऊन याचे सुतोवात करून दिले होते. एकूणच राज्यपातळीवरील घडामोडीमुळे जिल्ह्याचे वातावरण तापलेले आहे. गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, अहेरी, गडचिरोली हे तीन मतदार संघ आहेत. तिनही मतदार संघ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत आरमोरी व गडचिरोली हे दोन मतदार संघ काँग्रेसकडे तर अहेरी हा विधानसभा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. भाजप-शिवसेना युतीच्या समीकरणात गडचिरोली व अहेरी हे भाजपकडे तर आरमोरी विधानसभा क्षेत्र हे शिवसेनेकडे आहे. आजवर आघाडी व युती राहत आल्याने या मतदार संघांमध्ये यावेळीही अशीच वाटणी होईल, असे सर्वच पक्षाचे राजकीय जाणकार सांगतात. सध्या भाजपने अहेरी विधानसभा क्षेत्रात निवडणुकीचा बिगुल फुंकला आहे. येथे नाग विदर्भ आंदोलन समितीसोबत लोकसभा निवडणुकीपासूनच भाजपने घरोबा केला आहे. त्यामुळे त्यांचा उमेदवार येथे मैदानात राहील. राष्ट्रवादी काँग्रेसही येथे तयारीला लागली आहे. तर विद्यमान अपक्ष आमदार पुन्हा मैदानात उतरण्यासाठी पुन्हा समशेर पाजळून आहेत. येथे तिरंगी लढतीचे चित्र असले तरी बहुजन समाजपार्टी ही आपला उमेदवार मैदानात उतरविण्याची शक्यता आहे. गडचिरोली विधानसभा मतदार संघात विद्यमान काँग्रेस आमदारांना तिकीटासाठी जोरदार संघर्ष करावा लागत आहे. येथून माजी खासदारांचेही नाव तिकीटासाठी दावेदार म्हणून आघाडीवर आहे. भाजपकडेही गडचिरोलीत इच्छुकांची मोठी गर्दी आहे. पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळते, हे सांगणे कठीण असल्याचे कार्यकर्ते म्हणतात. मात्र भाजपकडे दोनच नाव प्रामुख्याने आहेत. व या नावावर संघ मुख्यालयातूनही शिक्का मोर्तब झाले, अशी चर्चा आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात शिवसेनेचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. तरीही सेनेचे माजी आमदार उमेदवार म्हणून तयारीला लागले आहेत. काँग्रेसकडे उमेदवार म्हणून विद्यमान आमदारच प्रबळ दावेदार आहे. त्यांना उमेदवारीही मिळेल, अशी चिन्ह आहे. एकूणच अद्याप महाराष्ट्राचे आघाडी व युतीचे चित्र स्पष्ट झालेले नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप, शिवसेना साऱ्या जागांवर लढण्यासाठी चर्चा करीत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही मैदानात उतरण्याची शक्यता आहे. एकूणच हे सारे चित्र २० तारखेपर्यंत स्पष्ट होईल.लोकसभा निवडणुकीतून काँग्रेस-राकाँ आघाडी अद्यापही सावरलेली नाही. मात्र महायुती प्रचाराला प्रारंभ करण्याच्या तयारीत आहे. जोपर्यंत आघाडी व युतीमध्ये अधिकृतरित्या घोषणा होत नाही, तोपर्यंत ही धुसफूस सुरूच राहील, असे कार्यकर्ते म्हणतात. (जिल्हा प्रतिनिधी)