वैनगंगा नदीच्या पुलावर कठड्यांअभावी धाेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:34 IST2021-03-06T04:34:21+5:302021-03-06T04:34:21+5:30

आरमाेरी : आरमाेरी-ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदीवरील पुलाचे कठडे वाहून गेले आहेत. त्यामुळे एखादे वाहने नदीत काेसळण्याचा धाेका निर्माण ...

Lack of embankment on Wainganga river bridge | वैनगंगा नदीच्या पुलावर कठड्यांअभावी धाेका

वैनगंगा नदीच्या पुलावर कठड्यांअभावी धाेका

आरमाेरी : आरमाेरी-ब्रम्हपुरी मार्गावरील वैनगंगा नदीवरील पुलाचे कठडे वाहून गेले आहेत. त्यामुळे एखादे वाहने नदीत काेसळण्याचा धाेका निर्माण झाला आहे.

आरमाेरी-ब्रम्हपुरी मार्गावरून जिल्हाभरातील नागरिक नागपूर येथे जातात. त्यामुळे या मार्गावरून रात्रंदिवस वाहनांची वर्दळ राहते. नदीवरील पूल अतिशय जुना आहे. त्यामुळे या पुलावर सिमेंटचे कठडे बांधण्यात आले नाहीत. परिणामी लाेखंडी कठडे उभारावे लागतात. यावर्षी वैनगंगा नदीला पूर आला होता. पुराचे पाणी पुलावर चढल्याने अनेक लाेखंडी कठडे वाहून गेले. तर काही कठडे वाकले आहेत. कठडे नसल्याने एखादे वाहन पुलावरून नदीत काेसळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच एक युवक नदीत काेसळल्याने त्याचा मृत्यू झाला. पुन्हा अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Lack of embankment on Wainganga river bridge