कुरखेडा तालुक्याला दुसऱ्यांदा मिळाले उपाध्यक्ष पद

By Admin | Updated: September 21, 2014 23:50 IST2014-09-21T23:50:55+5:302014-09-21T23:50:55+5:30

जिल्हा परिषदेच्या स्थापनेनंतर कुरखेडा तालुक्याला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद हे दुसऱ्यांदा मिळाले आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात समाविष्ट असलेल्या कुरखेडा तालुक्याला यावेळी जीवन

Kurukha taluka gets second Vice-President post | कुरखेडा तालुक्याला दुसऱ्यांदा मिळाले उपाध्यक्ष पद

कुरखेडा तालुक्याला दुसऱ्यांदा मिळाले उपाध्यक्ष पद

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या स्थापनेनंतर कुरखेडा तालुक्याला जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद हे दुसऱ्यांदा मिळाले आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात समाविष्ट असलेल्या कुरखेडा तालुक्याला यावेळी जीवन पाटील नाट यांच्या रूपाने काँग्रेस पक्षाकडून अध्यक्ष पद मिळालेले आहे. २६ आॅगस्ट १९८२ ला गडचिरोली जिल्ह्याची स्थापना झाली. त्यानंतर १० वर्षांनी पहिली निवडणूक झाली. आरमोरी विधानसभा क्षेत्रात समाविष्ट असलेल्या कुरखेडा तालुक्याच्या राजकारणातून मालदुगी गावचे केशव राऊत यांना १९९४ ते १९९६ या कालावधीत गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद मिळाले होते.
केशव राऊत हे अपक्ष सदस्य म्हणून जिल्हा परिषदेवर निवडून आले होते. मात्र त्यांना उपाध्यक्ष पद हे काँग्रेसच्या सहकार्याने प्राप्त झाले होते. त्यानंतर कुरखेडा तालुक्याला जिल्हा परिषदेच्या राजकारणात सभापती पदे मिळत राहिली. मात्र उपाध्यक्ष पदाची संधी मिळण्यासाठी २०१४ उजाडावे लागले. अचानकपणे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती झाल्याने काँग्रेसचे अधिकृत सदस्य असलेले जीवन पाटील नाट यांना कुरखेडा तालुक्यातून ही संधी मिळाली. कुरखेडा तालुक्याच्या पलसगड-पुराडा या जिल्हा परिषद क्षेत्रातून नाट हे निवडून आले आहेत. त्यांनी २०१२ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसच्या १३ सदस्यांमध्ये सर्वाधिक पाच सदस्य हे आरमोरी तालुक्यातील काँग्रेसच्या पोरेड्डीवार गटाचे आहेत. त्यामुळे नाट यांना लॉटरी लागली.

Web Title: Kurukha taluka gets second Vice-President post