लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरची-भीमपूर मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडून दुररवस्था झाल्याने या मार्गाने आवागमन करताना नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. छत्तीसगड राज्यातून अवजड वाहनांची वाहतूक याच मार्गे होत असते. त्यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे विस्तारत आहेत. परिणामी नियमित आवागमन करणारे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.कोरची-भीमपूर मार्गाने सोहले, झेंडेपार, नांदळी, मर्केकसा, बोटेकसा येथील तसेच परिसराच्या अनेक गावातील नागरिक आवागमन करतात. याच रस्त्याने छत्तीसगड राज्यातून अनेक सामान भरलेले अवजड वाहने येतात. या मार्गाची उन्हाळ्यातच दुरवस्था झाली होती. परंतु मार्गाच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झाले. पावसाळ्यात पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही. परिणामी वाहन खड्ड्यात गेल्यानंतर खड्डे विस्तारतात. मार्गावरील खड्ड्यांमध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून असल्याने संपूर्ण रस्ताच चिखलमय झाल्याचे दिसून येते. सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जि.प . बांधकाम विभागाचेही रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.पर्यायी मार्ग उपलब्ध कराछत्तीसगड राज्यातून कोरची तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवजड वाहने येतात. त्यामुळे या भागातील रस्त्यांची दुरवस्था होत आहे. पावसाळ्यात खड्डे विस्तारत असल्याने येथून आवागमन करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे छत्तीसगड राज्यातून येणाºया अवजड वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे.
कोरची-भीमपूर मार्ग खड्ड्यांमुळे चिखलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:08 IST
कोरची-भीमपूर मार्गाने सोहले, झेंडेपार, नांदळी, मर्केकसा, बोटेकसा येथील तसेच परिसराच्या अनेक गावातील नागरिक आवागमन करतात. याच रस्त्याने छत्तीसगड राज्यातून अनेक सामान भरलेले अवजड वाहने येतात. या मार्गाची उन्हाळ्यातच दुरवस्था झाली होती. परंतु मार्गाच्या डागडुजीकडे दुर्लक्ष झाले. पावसाळ्यात पावसाचे पाणी खड्ड्यांमध्ये साचत असल्याने वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नाही.
कोरची-भीमपूर मार्ग खड्ड्यांमुळे चिखलमय
ठळक मुद्देवाहनधारक त्रस्त : छत्तीसगड राज्यातून अवजड वाहनांची वाहतूक वाढली