आयटीआयतील शिल्प निर्देशकास १७०० रूपयांची लाच घेताना अटक

By Admin | Updated: July 25, 2015 01:52 IST2015-07-25T01:52:54+5:302015-07-25T01:52:54+5:30

गडचिरोली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प निर्देशकास प्रात्यक्षिक परीक्षेत जास्त गुण देण्याच्या कामासाठी १७०० रूपयांची लाच घेताना ...

ITI's craftsman arrested for accepting a bribe of Rs. 1700 | आयटीआयतील शिल्प निर्देशकास १७०० रूपयांची लाच घेताना अटक

आयटीआयतील शिल्प निर्देशकास १७०० रूपयांची लाच घेताना अटक

एसीबीची कारवाई : प्रात्यक्षिक परीक्षेत अधिक गुण देण्याचे प्रलोभन
गडचिरोली : गडचिरोली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प निर्देशकास प्रात्यक्षिक परीक्षेत जास्त गुण देण्याच्या कामासाठी १७०० रूपयांची लाच घेताना शुक्रवारी दुपारी १२.५० वाजता रंगेहात पकडण्यात आले.
गडचिरोली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्प निर्देशक असलेले पीतांबर निजबोध सुटे (४०) यांनी वायरमन विभागाची प्रात्यक्षिक परीक्षा २८ जुलैपासून सुरू होणार असल्याने या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना जास्तीचे गुुण देण्याचे प्रलोभन दाखविले होते व विद्यार्थ्यांकडून लाचेची मागणी त्यांनी केली होती. प्रात्यक्षिक परीक्षेत जास्तीत जास्त गुण देण्याकरिता तक्रारकर्त्यास १७०० रूपये त्यांनी मागितले. तक्रारकर्त्याने यासंदर्भात गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर शुक्रवारी सापळा रचून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील वायरमन विभागाच्या कार्यशाळेत सुटे यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या विरूद्ध गडचिरोली पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक दामदेव मंडलवार, सहाय्यक फौजदार मोरेश्वर लाकडे, पोलीस हवालदार विठोबा साखरे, सत्यम लोहंबरे, रवींद्र कत्रोजवार, सतिश कत्तीवार, नरेश आलाम, देवेंद्र लोनबले, महेश कुकुडकर, सोनल आत्राम, उमेश मासुरकर यांनी पार पाडली. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: ITI's craftsman arrested for accepting a bribe of Rs. 1700