शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नातेवाईकांचे अंतिम दर्शन घेणेही सामान्यांना कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 05:00 IST

कोरोना संकटानंतर सद्य:स्थितीत जनजीवन रुळावर आले आहे. शासनाने अनेक निर्बंधही हटविले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आपापल्या कामाला लागले आहेत. दरम्यान, ऐन दिवाळीच्या दिवसापासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. आज ना उद्या संप मिटेल या आशेवर असलेल्या नागरिकांची निराशा झाली. महिना उलटला तरीही संप काही सुटला नाही. त्यातच मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील पॅसेंजर अजूनही बंद आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संकटानंतर आता स्पेशल दर्जा काढून नियमित ट्रेन सुरू झाल्या आहेत. मात्र, जनरलचे तिकीटच मिळत नसल्याने अनेकांना अडचणीचे होत आहे. कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यदर्शनासाठी जाणेही सद्य:स्थितीत कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचा विचार करून जनरल तिकीट सुरू करावे, तसेच एसटी संपावरही तोडगा काढण्याची मागणी आता सर्वसामान्यांकडून केली जात आहे.कोरोना संकटानंतर सद्य:स्थितीत जनजीवन रुळावर आले आहे. शासनाने अनेक निर्बंधही हटविले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आपापल्या कामाला लागले आहेत. दरम्यान, ऐन दिवाळीच्या दिवसापासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. आज ना उद्या संप मिटेल या आशेवर असलेल्या नागरिकांची निराशा झाली. महिना उलटला तरीही संप काही सुटला नाही. त्यातच मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील पॅसेंजर अजूनही बंद आहे. विशेष ट्रेन आता सर्वसाधारण झाल्या आहेत. मात्र, जनरलचे तिकीटच मिळत नसल्याने सामान्यांचा प्रवासही कठीण झाला आहे. त्यातच अडचणीच्या वेळी किंवा कुटुंबातील एखाद्याचा मृत्यू झाल्यास प्रवास कसा करायचा, हा प्रश्न सामान्यांना पडला आहे. 

हिंमत करणे पडणार महागातरेल्वेचे जनरल तिकीट देणे बंद आहे. असे असतानाच काही जण अत्यावश्यक ठिकाणी जायचे असल्यास मोठी हिंमत करून आरक्षण डब्यातून प्रवास करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांना दंड भरावा लागत असून मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.

खासगी वाहन परवडेनाकुटुंबातील नातेवाइकांचा अचानक मृत्यू झाल्यास सामान्य नागरिकांना जाण्याचा मोठा प्रश्न पडतो. हक्काची एसटी बंद आहे. रेल्वेने जाण्यासाठी आधीच आरक्षण करावे लागते. खासगी वाहन करावे तर खिशात पैसा नाही, अशावेळी काय करावे, हा प्रश्न त्यांना पडत आहे.

सामान्यांची कुचंबणा का?केंद्र सरकारने अंत्योदय योजनेतील गरिबांना मोफत धान्य मिळावे यासाठी योजनेत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे गरिबांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारलाही भारतात गरीब नागरिक राहतात, हे ठाऊक आहे तर त्यांच्यासाठी असलेली पॅसेंजर, रेल्वेतील जनरल तिकीट बंद करून कुचंबणा का केली जाते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वेST Strikeएसटी संप