तरुणांमुळेच मुले व ज्येष्ठांमध्ये वाढताेय काेराेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:35 IST2021-04-13T04:35:08+5:302021-04-13T04:35:08+5:30

बाॅक्स .... घरी आल्यानंतर ही काळजी घ्या कामावरून घरी आल्यानंतर सर्वप्रथम ताेंडावरील मास्क काढून त्याची याेग्य विल्हेवाट लावावी. हातांवर ...

It is because of the youth that children and the elderly grow up | तरुणांमुळेच मुले व ज्येष्ठांमध्ये वाढताेय काेराेना

तरुणांमुळेच मुले व ज्येष्ठांमध्ये वाढताेय काेराेना

बाॅक्स ....

घरी आल्यानंतर ही काळजी घ्या

कामावरून घरी आल्यानंतर सर्वप्रथम ताेंडावरील मास्क काढून त्याची याेग्य विल्हेवाट लावावी.

हातांवर सॅनिटायझर चाेळावे, सॅनिटायझर उपलब्ध नसल्यास साबनाने हात स्वच्छ धुवावे. त्यानंतर अंघाेळ करावी. दर दिवशी कपडे धुण्यास टाकावे.

अंघाेळीच्या पूर्वी लहान बालक, ज्येष्ठ नागरिकांच्या संपर्कात येऊ नये तसेच घरातील वस्तूंनाही स्पर्श करू नये. ही काळजी घेतल्यास काेराेना संसर्गापासून कुटुंबातील इतर सदस्यांना संसर्गापासून वाचविणे शक्य आहे. यासाठी घरातील इतर व्यक्तींनी तरुणांना सल्ला देण्याची गरज आहे.

काेराेनाची लक्षणे दिसून आल्यास वेळीच तपासणी करून रुग्णालयात भरती हाेणे किंवा स्वत:ला क्वाॅरण्टाइन करून घेणे आवश्यक आहे.

बाॅक्स ......

अनेक कुटुंबांचा रुग्णालयात मुक्काम

तरुणांनी काळजी न घेतल्याने अनेक कुटुंब काेराेनाबाधित हाेऊन रुग्णालयांमध्ये एकत्र उपचार घेत आहेत. संपूर्ण कुटुंब रुग्णालयात दाखल झाल्याने घराला कुलूप लागली आहेत. गडचिराेली शहरात अशी अनेक कुटुंब आढळून येतात. घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तीला चुकून काेराेनाची लागण हाेऊ शकते. मात्र त्याला जरी लागण झाली तरी घरी आल्यानंतर याेग्य ती काळजी घेतल्यास इतरांना संसर्गापासून वाचविणे शक्य आहे.

दुसऱ्या लाटेत २० वर्षांखालील पाॅझिटिव्ह - ११८

६० वर्षांपेक्षा अधिक पाॅझिटिव्ह - २७८

एकूण पाॅझिटिव्ह - ३,३३५

Web Title: It is because of the youth that children and the elderly grow up