शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
5
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
6
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
7
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
8
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
9
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
10
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
11
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
12
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
13
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
14
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
15
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
16
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
17
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
19
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
20
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त मजुरांची तहसीलवर धडक

By admin | Updated: February 4, 2016 01:25 IST

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत धानोरा नगर पंचायत क्षेत्रात कामे सुरू करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा,

रोहयोंतर्गत कामे द्या : तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनधानोरा : महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत धानोरा नगर पंचायत क्षेत्रात कामे सुरू करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा, या मागणीसाठी बुधवारी नगर पंचायत क्षेत्रातील संतप्त शेकडो शेतकरी व शेतमजूर तहसील कार्यालयावर धडकले. धानोराचे तहसीलदार सुधाकर मडावी यांना भेटून रोहयो कामासंदर्भात मजुरांनी चर्चा केली. प्रशासनाच्या आवाहनानुसार धानोरा नगर पंचायत क्षेत्रातील अनेक मजुरांनी रोजगार हमी योजनेच्या कामासाठी नोंदणी केली आहे. मात्र अद्यापही प्रशासनाच्या वतीने रोहयोची कामे सुरू करून रोजगार देण्यात आला नाही. आधीच दुष्काळी व नापिकीची स्थिती आहे. अशा परिस्थितीत शेतकरी, शेतमजुरांना दिलासा देण्यासाठी रोजगार हमी योजनेची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने कार्यवाही करावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार सुधाकर मडावी यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. निवेदन देताना तुकाराम गडपायले, बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी रमेश मडावी, वंदना गडपायले, मुखरू मोहुर्ले, प्रतिभा गुरनुले, दिलीप गुरनुले, मंगला मोहुर्ले, सदाशिव ठाकरे, पार्वता ठाकरे, छाया लोनबले, अरूणा सोनुले, भास्कर सोनुले, वामण लोनबले, एकनाथ सोनुले, दिलीप निकेसर, रमेश सहारे, गीता सहारे, श्रीकृष्ण गुरनुले आदींसह शेकडो मजूर व नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)मुख्याधिकाऱ्यांनाही घातले साकडेधानोरा नगर पंचायत क्षेत्रात अद्यापही रोजगार हमी योजनेंतर्गत काम सुरू करण्यात न आल्याने शेकडो मजूर बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे तत्काळ नगर पंचायतीच्या क्षेत्रात रोहयोची कामे सुरू करण्यात यावी, अशा मागणीचे साकडे मजुरांनी धानोरा न. पं. चे मुख्याधिकारी मेश्राम यांना निवेदनाद्वारे घातले आहे. कामे सुरू न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा तुकाराम गडपायले यांनी दिला आहे.