शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन प्रक्रियेने केला नामाकंन दाखल करण्याचा खोळंबा

By admin | Updated: October 2, 2015 06:12 IST

जिल्ह्यात १० नगर पंचायतीपैकी सहा नगर पंचायतींची निवडणूक पहिल्या टप्प्यात घेण्यात येत आहे. येथे निवडणूक

गडचिरोली : जिल्ह्यात १० नगर पंचायतीपैकी सहा नगर पंचायतींची निवडणूक पहिल्या टप्प्यात घेण्यात येत आहे. येथे निवडणूक प्रक्रियेला गुरूवारपासून प्रारंभ झाला. परंतु आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरण्याबाबत तालुका प्रशासनाने सूचना केली असल्याने उमेदवारांचा चांगलाच गोंधळ उडाला. पहिल्या दिवशी जिल्ह्यात एकही नामांकन अर्ज दाखल होऊ शकला नाही. गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १ नोव्हेंबर रोजी मतदान होणाऱ्या सहा नगर पंचायतीसाठी गुरूवारपासून निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला. पहिल्या टप्प्यात भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, मुलचेरा, अहेरी, चामोर्शी या सहा नगर पंचायतीसाठी १ आॅक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. अहेरी, चामोर्शी या दोन मोठ्या नगर पंचायतीसह उर्वरित चार नगर पंचायतीत अर्ज दाखल करण्याकरिता इच्छुक उमेदवार तहसील कार्यालयात गेले असताना उमेदवारांना आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरण्याबाबत सूचना करण्यात आली होती. चामोर्शी येथे राज्य निवडणूक आयोगाच्या आॅनलाईन संकेतस्थळ बराच वेळ ओपनच झाले नाही. त्यामुळे बराच खोळंबा झाला. त्यानंतर दुपारी ३ वाजतानंतर गडचिरोली जिल्ह्याला आॅनलाईन नामांकन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेतून सूट देण्यात आली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. या बाबीला चामोर्शीचे नायब तहसीलदार एस. के. चडगुलवार यांनी लोकमतशी बोलताना दुजोरा दिला. अहेरी, चामोर्शी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा येथे पहिल्या दिवशी एकही नामांकन पत्र दाखल झाले नाही. (जिल्हा प्रतिनिधी)अर्ज तयार केले जाणारराज्य निवडणूक आयोगाने आपल्या संकेतस्थळावर आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरावे, असे सांगितले होते. मात्र याला स्थगिती मिळाल्यावर आता तालुका निवडणूक प्रशासन अर्ज तयार करणार आहेत.