शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

बांबू लागवड करून उत्पन्न वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:00 IST

उच्च प्रजातीच्या बांबू रोपांची लागवड शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीत ५ बाय ५ मीटर अंतरावर शाश्वत पद्धतीने लागवड केल्यास शेतकºयांच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढतात. प्रतीरोप २४० रुपये दराने सदर योजनेअंतर्गत खर्च मंजूर झाला आहे. या योजनेअंतर्गत मानवेल, कटांग, माणगा, बालकोवा, ब्रानडीसी, न्यूटन्स, अ‍ॅप्सपर, टुल्डा आदी प्रकारचे बांबू रोपे उपलब्ध आहे.

ठळक मुद्देरोपे उपलब्ध : नितीन कावडकर यांचा शेतकऱ्यांना सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत बांबू टिश्यू कल्चर रोपे लागवडीसाठी यंदाच्या पावसाळ्यात उपलब्ध आहेत. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बांबू लागवड करून उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावे, असा सल्ला महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे गडचिरोली वनवृत्ताचे समन्वयक नितीन कावडकर यांनी केले आहे.उच्च प्रजातीच्या बांबू रोपांची लागवड शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीत ५ बाय ५ मीटर अंतरावर शाश्वत पद्धतीने लागवड केल्यास शेतकºयांच्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढतात. प्रतीरोप २४० रुपये दराने सदर योजनेअंतर्गत खर्च मंजूर झाला आहे. या योजनेअंतर्गत मानवेल, कटांग, माणगा, बालकोवा, ब्रानडीसी, न्यूटन्स, अ‍ॅप्सपर, टुल्डा आदी प्रकारचे बांबू रोपे उपलब्ध आहे. सदर योजनेअंतर्गत शेतकºयांना ५० टक्के सबसीडी मिळणार आहे. अनुदानाची रक्कम तीन टप्प्यात देण्यात येणार आहे.लागवडीच्या पहिल्या वर्षी अनुदानाची ५० टक्के रक्कम दोन हप्त्यात तर लागवड पूर्ण झाल्यावर व १०० टक्के रोपे जिवंत असल्याची खात्री झाल्यावर उर्वरित ५० टक्के अनुदान मार्च महिन्यात देण्यात येणार आहे. याचा शेतकºयांनी लाभ घ्यावा, असे कावडकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीforestजंगल