शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

धानोरा तालुक्यात शेकडो एकर जंगलात अवैध वृक्षतोड

By admin | Updated: January 30, 2016 02:01 IST

धानोरा तालुक्यात चातगाव, कटेझरी, कुडकवाही व सिंगापूर येथील जंगलात अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे.

वन विभाग सुस्त : चातगाव, कटेझरी, कुडकवाही व सिंगापूर भागात प्रकारगडचिरोली : धानोरा तालुक्यात चातगाव, कटेझरी, कुडकवाही व सिंगापूर येथील जंगलात अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. हजारो रूपये किमतीची वनसंपदा व्यापारी व धनाढ्य लोकांनी नष्ट केली असून त्यांच्यावर या संदर्भात गुन्हे दाखल करून या वृक्षतोडीची रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीद्वारे जययुवक क्रांतीदल चातगावचे अध्यक्ष विलास पेंदाम, उपाध्यक्ष गणेश तोडासे, सचिव धनराज कोसरे यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे केली आहे. या तक्रारीत जय युवक क्रांती दलाने म्हटले आहे की, शासनाने वनहक्काची जमीन गोरगरीब नागरिकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. जे अनेक वर्षांपासून या जमिनीवर उपजीविका करतात. त्यांना नियमित उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असला तरी वन हक्क कायद्याचा दुरूपयोग करून चातगाव परिक्षेत्रातील जमिनीची लयलूट काहींनी सुरू केली आहे. सर्रास जंगल कापून शासकीय संपत्तीचे नुकसान केले जात आहे. सिंगापूर, चातगाव, कटेझरी येथील शेकडो एकर जंगल कापून वन जमिनी निर्माण करण्यात आल्या, असे चित्र दिसून येत आहे. सिंगापूर येथे एका व्यक्तीने ७० एकर जमिनीवरचे जंगल कापून काढले आहे. चातगाव, कटेझरी येथे अनेक प्रस्तापितांनी १० ते १२ एकर जंगल कापून शेतीत परिवर्तन केले आहे. वन विभागाच्या १० ते १२ एकर जंगल साफ करण्यात आला असून या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा जययुवक क्रांतीदलाने दिला आहे. या भागात चांगल्या सार्वजनिक कामांसाठी तसेच शाळा, महाविद्यालय, रुग्णालय यांना जमीन देण्यास विरोध करून चोरट्यांना वृक्षतोड करून रान मोकळे करून दिले जात आहे. दीडशे एकर जागेवर वृक्षतोड झाल्याने या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फतही चौकशी करावी, अशी मागणी आहे. (जिल्हा प्रतिनिधी)