शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

वांगेपल्ली पुलावरून अवैध आवागमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:01 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रशासनाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र वांगेपल्ली पुलावरून तेलंगणातील नागरिक तसेच तेलंगणा राज्यात काम करण्यासाठी गेलेले मजूर कोणतीही परवानगी न घेता गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. महाराष्ट्रप्रमाणेच तेलंगणा राज्यातही कोरोनाने थैमान घातले आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : तेलंगणा राज्यातील नागरिकांचा अहेरी तालुक्यात होत आहे प्रवेश

प्रतीक मुधोळकर ।लोकमत न्यूज नेटवर्कनागेपल्ली : प्राणहिता नदीवर बांधण्यात आलेल्या वांगेपल्ली घाटावरून तेलंगणा राज्यातून नागरिकांची अवैध ये-जा सुरू आहे. यामुळे अहेरी तालुक्याला कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे.महाराष्ट्र व तेलंगणा राज्याची दुभाजक असलेल्या प्राणहिता नदीवर तेलंगणा राज्याने पुलाचे बांधकाम केले आहे. पुलाचे काम पूर्णत्त्वास आले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ सुरू झाली आहे. मात्र पुलाचे लोकार्पण झाले नसल्याने अधिकृतरित्या सार्वजनिक वाहतूक सुरू झाली नाही. तेलंगणा व अहेरी तालुक्यातील नागरिकांचे रोटीबेटी व्यवहार होत असल्याने दोन्ही राज्यातील नागरिकांची ये-जा सुरू राहते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रशासनाकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र वांगेपल्ली पुलावरून तेलंगणातील नागरिक तसेच तेलंगणा राज्यात काम करण्यासाठी गेलेले मजूर कोणतीही परवानगी न घेता गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. महाराष्ट्रप्रमाणेच तेलंगणा राज्यातही कोरोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत तेलंगणा राज्यातून येणाºया प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी होणे आवश्यक आहे. मात्र या ठिकाणी पथक नसल्याने आरोग्य तपासणी न होताच नागरिक जिल्ह्यात प्रवेश करीत आहेत. गडचिरोली जिल्हा प्रशासनाने सीमेवरील प्रत्येक पुलावर पोलीस पथक तैनात केले आहे. त्या ठिकाणी आरोग्य विभागाची चमूसुद्धा कार्यरत राहते. त्यामुळे अवैधरित्या जिल्ह्यात प्रवेश करता येत नाही. परवानगी घेऊन जिल्ह्यात येणाºया प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी केली जाते. मात्र वांगेपल्ली पुलावरून अशी यंत्रणा नसल्याने नागरिकांची खुलेआम ये-जा सुरू आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन या ठिकाणी पोलीस व आरोग्य विभागाचे पथक तैनात करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.पथकाची गरजअवैधरित्या जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्यांवर लगाम घालण्यासाठी या ठिकाणी पोलीस व आरोग्य विभागाचे पथक नेमणे आवश्यक आहे. पूर्वी नागरिक नदीमार्गे प्रवास करीत होते. मात्र आता नदीच्या पाण्याची पातळी वाढली असल्याने पुलावरून ये-जा करणे हा एकमेव पर्याय आहे. या ठिकाणी पथक नेमल्यास अवैध प्रवेशावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTrafficवाहतूक कोंडी