शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 01:00 AM2018-11-10T01:00:32+5:302018-11-10T01:01:49+5:30

काँग्रेस व भाजपा मनुवादी व भांडवलदारांठी काम करुन सर्वसामान्य कष्टकरी जनतेला लुटण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे या पक्षांना सत्तेतून हुसकावून लावण्यासाठी तसेच कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा खांद्यावर घेऊन नि:स्वार्थीपणे काम करावे, ......

Ignore the problem of farmers | शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष

शेतकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष

Next
ठळक मुद्देशेकापचा आरोप : घारगाव येथे कार्यक्रम; शेतकºयांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : काँग्रेसभाजपा मनुवादी व भांडवलदारांठी काम करुन सर्वसामान्य कष्टकरी जनतेला लुटण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे या पक्षांना सत्तेतून हुसकावून लावण्यासाठी तसेच कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा खांद्यावर घेऊन नि:स्वार्थीपणे काम करावे, असे आवाहन शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते यांनी केले.
घारगाव येथील नवयुवक गणेश मंडळाच्या वतीने बलिप्रतिपदे निमित्य आयोजित कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली विधानसभा चिटणीस नरेश मेश्राम होते. यावेळी महिला नेत्या जयश्री वेळदा, चामोर्शी तालुका चिटणीस दिनेश चुधरी, दामोधर रोहनकर, प्रदीप आभारे, रमेश चौखुंडे, राजू केळझरकर, धनराज वासेकर, प्रकाश सहारे, सरपंच सुष्मा आभारे उपस्थित होते. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या अनेक समस्यांवर मनोगत व्यक्त करून त्या सोडविण्यासाठी सरकारवर दबाव टाकण्यासाठी आंदोलन उभारण्यास सहकार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवयुवक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Ignore the problem of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.