शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

भविष्यात मास्क लावायचा नसेल तर गैरसमज न ठेवता लस जरूर घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 05:00 IST

ना. वडेट्टीवार म्हणाले, राज्यात आपण कोरोनावर नियंत्रण मिळविले असले तरी अजून कोरोना गेला असे समजून गाफील राहू नका. कोरोनाला हरवायचे असेल तर मास्क लावणे, तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे पालन केल्यास निश्चितच कोरोना हद्दपार करता येईल. लसीकरण केल्यामुळे कोरोना विषाणुचा प्रभाव खूप कमी होतो. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण खूप कमी करण्यास मदत होईल. लस टोचाल तर वाचाल, हे लक्षात ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

ठळक मुद्देवडेट्टीवार यांचे आवाहन: नवेगावात पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : लसीकरणाबाबत कोणतीही अंधश्रद्धा आणि गैरसमज न बाळगता सर्वांनी कोरोनाची लस टोचून घ्यावी. मी कालच लसीचा दुसरा डोस घेतला आहे. सर्वांनी लस घेतल्यास भविष्यात आपल्याला मास्क घालायची गरज पडणार नाही, असे मार्गदर्शन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले. राज्यात हळूहळू अनलॉक करण्यात येत असल्यामुळे अधिक सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. सावरगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या लोकार्पणाच्या वेळी ते बोलत होते. गडचिरोलीलगत नवेगाव ग्रामपंचायतीअंतर्गत पाणी पुरवठा योजना व सावरगाव येथील आरोग्य उपकेंद्राचे लोकार्पण करण्यासाठी ते आले होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार डॉ.देवराव होळी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, जि.प.सदस्य रामभाऊ मेश्राम, पंचायत समिती सभापती मारोतराव इचोडकर, उपसभापती विलास दशमुखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शशिकांत शंभरकर, डॉ. सुनील मडावी उपस्थित होते.यावेळी ना. वडेट्टीवार म्हणाले, राज्यात आपण कोरोनावर नियंत्रण मिळविले असले तरी अजून कोरोना गेला असे समजून गाफील राहू नका. कोरोनाला हरवायचे असेल तर मास्क लावणे, तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशांचे पालन केल्यास निश्चितच कोरोना हद्दपार करता येईल. लसीकरण केल्यामुळे कोरोना विषाणुचा प्रभाव खूप कमी होतो. त्यामुळे मृत्यूचे प्रमाण खूप कमी करण्यास मदत होईल. लस टोचाल तर वाचाल, हे लक्षात ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यातील लसीकरण व आरोग्य सुविधांबाबत यावेळी त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्हयातील कोरोना स्थितीबाबतही चर्चा करून लसीकरणाला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. 

आदिवासी बांधवांशी साधला संवादसावरगाव येथे काही घरांबाहेर उपस्थित असलेल्या नागरिकांशी ना.वडेट्टीवार यांनी गाडीतून उतरून संवाद साधला व तेथील समस्यांबाबत चर्चा केली. गावकऱ्यांनी पाणी प्रश्नाबाबत अडचणी सांगितल्या. लगेच मंत्र्यांनी पाणी पुरवठा विभागाला समस्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी त्यांनी घरात जाऊन त्यांची विचारपूस केली.

दरडाेई पाणीपुरवठा वाढविण्यासाठी नियाेजन करा

जल जीवन मिशन प्रकल्पांतर्गत नवेगाव-मुरखळा ग्रामपंचायतीमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या ३.५ लक्ष लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचे व पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण मंत्र्यांच्या हस्ते झाले. शहरालगत असलेली व तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ठिकाणी लोकसंख्या वाढत आहे. भविष्यात दरडोई पाणी पुरवठा वाढविण्याची आवश्यकता पडेल. त्यासाठी आताच नियोजन करा व प्रस्ताव प्रशासनास सादर करा, आपण लोकांना आवश्यक पाणी देऊ, असे आश्वासन वडेट्टीवार यांनी यावेळी दिले.

 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcorona virusकोरोना वायरस बातम्या