घरावर वीज कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:41 IST2021-09-06T04:41:01+5:302021-09-06T04:41:01+5:30

(फोटो) चामोर्शी : कुनघाडा रै येथे शुक्रवारी (दि.३) संध्याकाळी ६.३० वाजता मुसळधार पावसादरम्यान विजांचा कडकडाट होऊन दोन घरांवर वीज ...

The house was struck by lightning | घरावर वीज कोसळली

घरावर वीज कोसळली

(फोटो)

चामोर्शी : कुनघाडा रै येथे शुक्रवारी (दि.३) संध्याकाळी ६.३० वाजता मुसळधार पावसादरम्यान विजांचा कडकडाट होऊन दोन घरांवर वीज कोसळली. यात तुकाराम सातपुते आणि वसंत वासेकर यांच्या घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भिंतीलाही भेगा पडल्या. पण, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

संध्याकाळी जोराचा पाऊस सुरू होता. त्यात विजांचा कडकडाटही झाला. तुकाराम सातपुते यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य घरीच असताना घराच्या वर असलेल्या पॅराफिटवर वीज कोसळली. यामुळे भिंतीला मोठ्या भेगा पडून विद्युतजनित्र जळाले. काैले फुटून टीव्हीची मशीनही बंद पडली. घरातील इतर साहित्य अस्ताव्यस्त झाले. तसेच वसंत वासेकर यांच्याही घरातील साहित्याची नासधूस झाली. दोन्ही घरांमधील वस्तूंचे नुकसान झाल्यामुळे शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी तुकाराम सातपुते व वसंत वासेकर यांनी केली आहे.

Web Title: The house was struck by lightning