शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
3
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
5
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
6
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
7
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
8
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
9
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
10
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
11
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
12
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
13
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
14
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
15
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
16
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
17
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
18
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
19
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
20
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणात ‘बायपास’ला आशा

By admin | Updated: January 4, 2015 23:12 IST

गडचिरोली जिल्ह्यात चार राष्ट्रीय महामार्ग मंजूर करण्यात आले आहे. या महामार्गाचे काम लवकरच निविदा प्रक्रिया काढून सुरू होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली व देसाईगंज

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात चार राष्ट्रीय महामार्ग मंजूर करण्यात आले आहे. या महामार्गाचे काम लवकरच निविदा प्रक्रिया काढून सुरू होणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली व देसाईगंज या नगर पालिका क्षेत्रांमध्ये बायपास रस्ते तसेच रिंगरोडचे काम रखडलेले आहे. आता राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होणार असल्याने त्याचवेळी या शहराच्या बायपास रस्त्याच्या कामांना त्यासोबत चालना मिळेल व बायपास रस्त्याची समस्या मार्गी लागेल, अशी आशा आहे.
गडचिरोली बायपास रस्ता राज्य महामार्ग २७५ (आरमोरी रस्ता) ते राज्य महामार्ग ७ (धानोरा रस्त्याजळील लांझेडा) ते राज्य महामार्ग २८० (फॉरेस्ट डेपोजवळ) ते राज्य जिल्हा रस्ता ३१ (फॉरेस्ट नर्सरी) ते राज्य महामार्ग २७५ (सेमाना देवस्थानजवळ) ते महाराष्ट्र राज्य मार्ग ७ (नवेगावजवळ) असा असून या संपूर्ण रस्त्याची लांबी गडचिरोली तालुक्यात १०.६४ किमीची राहणार आहे. या रस्त्याच्या बांधकामासाठी १००.२७ कोटी रूपयांची खर्च अपेक्षीत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग नं. १ गडचिरोली यांनी राज्य शासनाला दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.
या रस्त्यामध्ये शेती व वनजमीनसुध्दा जाणार आहे. या बायपास रस्त्यामुळे गडचिरोली शहरातील ४२ हजार ४६८, इंदाळा येथील १ हजार २६०, नवेगाव येथील ३ हजार ६७७, मुरखळा येथील १ हजार ४१०, विसापूर येथील १ हजार ६४५, लांझेडा येथील १ हजार ९५७ लोकांना फायदा होणार आहे, असेही सार्वजनिक बांधकाम विभागाने म्हटले आहे. या बायपास मार्गासाठी ११.६५ हेक्टर जमीन वन विभागाची तर ११.६० हेक्टर जमीन खासगी शेतकी जमीन अधिग्रहीत करावी लागणार आहे. वनजमीन अधिग्रहण करण्याकरिता १८६.४० लाख रूपये खर्च येणार असून खासगी शेतकी जमीन अधिग्रहीत करण्याकरिता २३२ लाख रूपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे बांधकाम विभागाने म्हटले आहे.
तसेच संदेश बोर्डासाठी १९१.५२ लाखाचा खर्च येणार आहे. रस्त्याचे बांधकाम, सीडीवर्क, छोटे पूल, रस्ता दुभाजक, फुटपाथ याकरीता ८५१२.०० लाख रूपयाचा खर्च अपेक्षित असल्याचे बांधकाम विभागाने नमूद केले आहे. तर बायपास मार्गाचे बांधकाम झाल्यानंतर विकासासाठी ४०० लाख रूपयाचा खर्च येणार आहे. एवढा निधी यापूर्वीच्या आघाडी सरकारने उपलब्ध करून दिला नाही. मागील अनेक वर्षांपासून बायपास रस्त्याच्या निर्मितीची नागरिकांना प्रतीक्षा आहे. सदर बायपास रस्त्यासाठी निधीकरिता राज्य सरकारने १७०० कोटी रूपयाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता. त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. आता केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गडचिरोली जिल्ह्यात चार राष्ट्रीय महामार्ग मंजूर केले आहेत व त्याची लवकरच निविदा प्रक्रिया होणार आहे. त्याचवेळी गडचिरोलीसह देसाईगंजच्या बायपास रस्त्याचेही काम यासोबतच केले जाईल, अशी माहिती आहे. (जिल्हा प्रतिनिधी)