अहेरीत शहिदांना श्रद्धांजली

By Admin | Updated: May 1, 2017 02:18 IST2017-05-01T02:18:37+5:302017-05-01T02:18:37+5:30

मागील आठवड्यात २४ एप्रिल रोजी छत्तीसगड राज्यातील सुकमा येथे नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या

Homage to martyrs | अहेरीत शहिदांना श्रद्धांजली

अहेरीत शहिदांना श्रद्धांजली

एसडीपीओ उपस्थित : सुकमा हल्ल्यातील शहिदांचे स्मरण
अहेरी : मागील आठवड्यात २४ एप्रिल रोजी छत्तीसगड राज्यातील सुकमा येथे नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या २५ वीर जवानांना उडाण फाऊंडेशन आलापल्लीतर्फे २९ एप्रिल रोजी शनिवारला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी आलापल्ली शहरातील वीर बाबुराव चौकात येथील सर्व व्यापारी, उमंग ग्रुपच्या सर्व महिला, उडाण फाऊंडेशनचे सदस्य तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे, पोलीस निरिक्षक संजय मोरे यांनी वीर शहीदांना श्रध्दांजली अर्पण केली. याप्रसंगी शहीदांनी देशासाठी दिलेले बलिदान कधीही व्यर्थ जाणार नाही. पोलीस याचा बदला घेऊन खऱ्या अर्थाने या वीर जवानांना श्रध्दांजली देतील, असे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोेंपे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उडाण फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष मंथनवार, सचिव रोमित तोंबर्लावार, सदस्य विशेष भटपल्लीवार, बंडू भांडेकर, गुड्डू गुप्ता, डॉ. सलूजा यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच गावातील नागरिक हजर होते. (प्रतिनिधी)

Web Title: Homage to martyrs