शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

होळी यांचा अर्ज वैध

By admin | Updated: September 30, 2014 23:35 IST

भारतीय जनता पक्षाचे गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील उमेदवार डॉ. देवराव माडगुजी होळी यांच्या उमेदवारी अर्जावरील प्रलंबित सुनावणी आज मंगळवारी उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर सकाळी ११ वाजता सुरू झाली.

निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय : तब्बल एक तास चालला आक्षेपावर युक्तिवादगडचिरोली : भारतीय जनता पक्षाचे गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील उमेदवार डॉ. देवराव माडगुजी होळी यांच्या उमेदवारी अर्जावरील प्रलंबित सुनावणी आज मंगळवारी उपविभागीय अधिकाऱ्यांसमोर सकाळी ११ वाजता सुरू झाली. तब्बल एक तासांच्या युक्तीवादानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी पी. शिवशंकर यांनी डॉ. देवराव होळी यांचा उमेदवारी अर्ज वैध असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे छाननी स्थळाजवळ जमलेल्या काँग्रेस, राकाँच्या शेकडो समर्थकांची निराशा झाली. तर भाजपने फटाके फोडून या निर्णयाचे जोरदार स्वागत केले. भाजपकडून उमेदवारी अर्ज भरणारे डॉ. देवराव होळी हे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवेत गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील ग्रामीण रूग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला. परंतु त्यांचा राजीनामा मंजुर झाल्याची माहिती जिल्हास्तरावरील आरोग्य यंत्रणेकडे नव्हती. त्यामुळे जिल्हास्तरावरील आरोग्य यंत्रणेने माहितीच्या अधिकारात दिलेल्या कागदपत्राच्या आधारे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मंडळींनी सोमवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आक्षेप घेतला होता. कालही तीन विधीज्ञांच्या उपस्थितीत डॉ. देवराव होळी यांची बाजू भारतीय जनता पक्षाच्यावतीने मांडण्यात आली. मात्र त्यानंतरही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णय राखून ठेवत कायदेशीर बाबी पडताळून पाहिल्या व आज सकाळी ११ वाजता कालच्या प्रलंबित राहिलेल्या युक्तीवादाला सुरूवात झाली. यावेळी डॉ. होळी यांच्यावतीने नागपूर येथील विधीज्ञ डॉ. गणेश एन. खानझोडे, अ‍ॅड. प्रमोद बोरावार यांच्यासह चार कायदेतज्ञांनी डॉ. होळी यांची बाजू मांडली. यावर काँग्रेसच्यावतीने हसनअली गिलानी, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने युवानेते ऋतूराज हलगेकर यांनीही बाजू मांडली. या सर्व युक्तीवादाला ऐकल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी पी. शिवशंकर यांनी आपला निर्णय जाहीर केला व डॉ. होळी यांचा उमेदवारी अर्ज वैध असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे भाजपचा जीव भांड्यात पडला.