हायमॉस्ट लाईट मुख्य मार्गावर लावावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:34 IST2021-04-13T04:34:57+5:302021-04-13T04:34:57+5:30

नगरपरीषदेच्या वतीने शहरातील मुख्य चौकात हॉयमॉस्ट लाईट लावण्यात आले होते. त्यापैकी फक्त इंदीरा गांधी चौकातीलच हायमॉस्ट लाईट मुख्य रस्त्यावर ...

The highest light should be placed on the main road | हायमॉस्ट लाईट मुख्य मार्गावर लावावे

हायमॉस्ट लाईट मुख्य मार्गावर लावावे

नगरपरीषदेच्या वतीने शहरातील मुख्य चौकात हॉयमॉस्ट लाईट लावण्यात आले होते. त्यापैकी फक्त इंदीरा गांधी चौकातीलच हायमॉस्ट लाईट मुख्य रस्त्यावर लावण्यात आला आहे. उर्वरीत हायमॉस्ट लाईट रस्त्याच्या कडेला लावण्यात आले आहेत. यामुळे या हायमास्ट लाईटचा मुख्य रस्त्यावर प्रकाश कमी व अन्य ठिकाणीच जास्त पडत असतो.

आता धानोरा-चंद्रपूर महामार्गाचे काम झाले आहे. रस्ता दुभाजकांचेही काम करण्यात आले आहे. सबंधितांच्या वतीने रस्त्यावर पथदिवेही लावण्यात येत आहेत. त्यामुळे नगरपरीषदेच्या वतीने यापुर्वी राज्य परीवहन महामंडळाच्या जागेत लावण्यात आलेला हायमॉस्ट लाईट आता बसस्थानकासमोरील मुख्य महामार्गावर लावण्यात यावा. हा हायमॉस्ट लाईट मुख्य महामार्गावर लावण्यात आल्यास या हायमॉस्ट लाईटचा प्रकाश सभोवताल पडून बसस्थानक परीसराच्या सौंदर्यात वाढ होईल तसेच आवाममन करणाऱ्यांना सुविधा निर्माण होईल. तसेच कारगील चौक, आयटीआय चौक, जिल्हा सामान्य रूग्णालय परीसरात लावण्यात आलेले हॉयमॉस्ट लाईट मुख्य महामार्गावर लावण्यात यावे अशीही मागणी नगरसेविका खोब्रागडे यांनी केली आहे.

Web Title: The highest light should be placed on the main road