शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

हिराचंदवर नागपुरात होणार उपचार

By admin | Updated: April 8, 2017 01:55 IST

ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील गरीब रूग्ण गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आमदार विजय वडेट्टीवार यांना मिळताच ..

जिल्हा रूग्णालयाला भेट : विजय वडेट्टीवार यांनी घेतली जबाबदारी;आरोग्य सेवेवर नाराजी गडचिरोली : ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील गरीब रूग्ण गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आमदार विजय वडेट्टीवार यांना मिळताच त्यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयाला भेट देऊन पारडी येथील रूग्ण हिराचंद परशुराम पुडके यांच्यावर नागपुरात उपचार करण्याची जबाबदारी घेतली. आ. विजय वडेट्टीवार यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयाला भेट देऊन पारडी येथील हिराचंद परशुराम पुडके, व्याहाड येथील भैय्याजी भोयर व ब्रम्हपुरी तालुक्याच्या मुडझा येथील रोशन गोविंदा नंदेश्वर यांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. हिराचंद पुडके यांच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत होऊन पाय फॅक्चर झाला आहे. त्याची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने आ. वडेट्टीवार यांनी हिराचंदच्या शस्त्रक्रिची जबाबदारी घेऊन त्याला ताबडतोब नागपूर येथे हलविण्याचे निर्देश दिले. तसेच व्याहाड बूज येथील भैय्याजी भोयर व मुडझा येथील रोशन नंदेश्वर यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले. जिल्हा सामान्य रूग्णालयात रूग्णांवर योग्य उपचार होत नसल्याबद्दल आ. विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली. रूग्णालयातील रिक्त पदांमुळे आरोग्य सेवेकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे रिक्त पदे भरण्यासंदर्भात आपण आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी डॉ. प्रमोद खंडाते, डॉ. अनिल रूडे, युवक काँगे्रसचे कुणाल पेंदोरकर, सतीश नंदकिशोर, मंगेश दिवटे, कमलेश खोब्रागडे, स्नेहल संतोषवार, दीपक गद्देवार, सुरेश म्हशाखेत्री हजर होते. (शहर प्रतिनिधी)