शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
4
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
5
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
6
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
7
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
8
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
9
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
10
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
11
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
12
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
13
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
14
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
15
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
16
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
17
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
18
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
19
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
20
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
Daily Top 2Weekly Top 5

कोरची तालुक्याला वादळी पाऊस, गारपिटीचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 23:21 IST

सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. जोराच्या वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. या वादळात नागरिकांच्या घरांवरील सिमेंट छत व कवेलू उडाले. सिमेंटची शिटही उलटून रस्त्यावर पडल्या. पाऊस आणि गारा घरात जमल्याने घरातील साहित्याचे नुकसान झाले.  

ठळक मुद्देझाडांसह विद्युत खांब, मोबाइल टॉवर उन्मळून पडले, अनेक गावांचा वीजपुरवठा रात्रभर खंडित

लाेकमत न्यूज नेटवर्ककोरची : जिल्ह्याच्या उत्तर टोकावर असलेल्या कोरची तालुक्याला बुधवारच्या संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाने झोडपून काढले. यावेळी अनेक भागात गारपिटही झाली. नागरिकांच्या घरांचे छत उडाले तर कुठे झाड कोसळून नुकसान झाले. यात जीवितहानी झाली झाल्याचे वृत्त नाही.सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला. जोराच्या वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. या वादळात नागरिकांच्या घरांवरील सिमेंट छत व कवेलू उडाले. सिमेंटची शिटही उलटून रस्त्यावर पडल्या. पाऊस आणि गारा घरात जमल्याने घरातील साहित्याचे नुकसान झाले.  कोरची शहरातील अनेक विद्युत खांब तुटून रस्त्यावर पडले. झाडे उन्मळून पडली. विशेष म्हणजे बीएसएनएलचा एक टॉवरही कोसळला. तसेच कार्यालयाची संरक्षक भिंत पडली. बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधील सिमेंटचे छत उडाले. अनेक विद्युत तारा रस्त्यावर पडून सर्व्हिस वायर तुटल्या आहेत.सायंकाळच्या सुमारास वातावरणात बदल झाल्याने ग्रामीण भागातील वीज पुरवठा काही वेळासाठी खंडित झाला हाेता. गडचिराेली शहरातही अधूनमधून वीजेचा लपंडाव सुरू हाेता. 

अवघ्या ३० मिनिटांत बदलले चित्रअचानक वातावरणात झालेला बदल आणि त्यानंतर वादळी पाऊस व गारपिट होण्याचा हा घटनाक्रम अवघ्या ३० मिनिटात आटोपला. पण या अल्पशा वेळेत कोरचीतील चित्र खूप बदलले होते. मागील चार-पाच दिवसांपासून वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून व्यक्त केली जात आहे. त्यातून सतर्क राहण्याचा इशाराही नागरिकांना दिला होता. गेल्या चार दिवसात नुकसानकारक काही झाले नसले तरी बुधवारी संध्याकाळचा थरार कोरचीवासीयांसाठी मोठा नुकसानकारक ठरला.

 

टॅग्स :Rainपाऊस