शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्राची इमारत जीर्णावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST

झिंगानूर आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली असून या इमारतींपासून केव्हाही धोका होऊ शकतो. झिंगानूर गावातील नागरिक, कर्मचारी व दुकानदारांनी मिळून आरोग्य केंद्राच्या परिसरात मोठ्या स्वरूपाचे शेड बांधकाम केले. जुनी इमारत पूर्णत: धोकादायक बनली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. मात्र दखल घेण्यात आली नाही.

ठळक मुद्देझिंगानूर येथील इमारतीची दुरवस्था : दुर्गम भागात आरोग्य सेवेचे धिंडवडे; पुरेशा सोईसुविधांचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कझिंगानूर : सिरोंचा तालुक्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य सेवेचे धिंडवडे निघत आहेत. याला अनेक बाबी कारणीभूत आहेत. यामध्ये आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या जीर्ण इमारती, वैैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, विविध सोयीसुविधांचा अभाव आदींचा समावेश आहे. झिंगानूर आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण झाली असून या इमारतींपासून केव्हाही धोका होऊ शकतो.झिंगानूर गावातील नागरिक, कर्मचारी व दुकानदारांनी मिळून आरोग्य केंद्राच्या परिसरात मोठ्या स्वरूपाचे शेड बांधकाम केले. जुनी इमारत पूर्णत: धोकादायक बनली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. मात्र दखल घेण्यात आली नाही.झिंगानूर परिसरातील २० ते २५ गावांमध्ये हे आरोग्य केंद्र वगळता आरोग्याच्या कोणत्याही सोयीसुविधा नाही. खासगी आरोग्य सेवाही तोकडी आहे. शिवाय या भागातील नागरिकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ते मोठ्या शहरात येऊन औषधोपचार करू शकत नाही. लोकप्रतिनिधी व जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सिरोंचा तालुक्याच्या झिंगानूर तसेच इतर ठिकाणच्या आरोग्य व उपकेंद्रांना भेटी देऊन समस्या जाणून घेतल्या नाही, असा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे.एकूणच अहेरी उपविभागाच्या पाचही तालुक्यात शासकीय आरोग्य सेवा अस्थिपंजर झाली असून या भागातील रूग्णांची मोठ्या प्रमाणावर हेळसांड होत आहे.लोहा, कल्लेड गाव विजेपासून वंचितभारतीय स्वातंत्र्याच्या ७३ वर्षानंतरही अहेरी तालुक्याच्या कोजेड ग्राम पंचायतींतर्गत येणाºया लोहा, कल्लेड येथे अद्यापही वीज पोहोचली नाही. सदर दोन्ही गावातील नागरिकांना रात्रीच्या सुमारास अंधाराचा सामना करावा लागतो. विद्युत पुरवठ्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी तीन ते चारदा महावितरणच्या अधिकाºयांना निवेदन दिले. मात्र कार्यवाही करण्यात आली नाही.

टॅग्स :Healthआरोग्य