शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास झाला डोकेदुखी

By admin | Updated: October 14, 2016 01:47 IST

गडचिरोली जिल्हा मुख्यालयाला जोडणारे बहुतांशी महामार्ग हे राष्ट्रीय महामार्गात मोडणारे आहे.

डागडुजीचे काम शहरात सुरू : नागरिकांकडून मात्र सार्वजनिक बांधकाम विभागावरच टीकेची झोडगडचिरोली : गडचिरोली जिल्हा मुख्यालयाला जोडणारे बहुतांशी महामार्ग हे राष्ट्रीय महामार्गात मोडणारे आहे. अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना या मार्गावरून प्रवास करताना प्रचंड मन:स्ताप खड्ड्यांमुळे सहन करावा लागत आहे. सर्वसामान्य नागरिक राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावाने ओरड करीत असले तरी या रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे असल्याने त्यांचीच जबाबदारी ठरते, अशी माहिती पुढे आली आहे. गडचिरोली शहरातून चंद्रपूर-गडचिरोली-धानोरा-राजनांदगाव हा राष्ट्रीय महामार्ग जातो. याशिवाय गडचिरोली-चामोर्शी-आष्टी-आलापल्ली-सिरोंचा, गडचिरोली-आरमोरी-देसाईगंज-गोंदिया हाही राष्ट्रीय महामार्ग जातो. यंदा प्रचंड अतिवृष्टीमुळे राष्ट्रीय महामार्गांना जागोजागी खड्डे पडले आहेत. चंद्रपूर-गडचिरोली मार्गाची तर अतिशय दुरवस्था झाली आहे. या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला करावे लागणार आहे. यात राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा कोणताही संबंध येत नाही. मात्र या रस्त्यावरून प्रवास करणारे अनेक प्रवासी सार्वजनिक बांधकाम विभागाच्याच नावाने बोटे मोडण्याचे काम करीत आहे. अनेक नागरिकही गडचिरोलीस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना गावागावातून दूरध्वनी व भ्रमध्वनीवर या रस्त्याच्या तक्रारी करीत आहेत. त्यामुळे त्यांनाही तेवढाच मन:स्ताप आपली जबाबदारी नसतानाही सहन करावा लागत आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या प्रश्नावरून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे रस्ते दुरूस्तीचे काम आहे. पावसाळा आता संपला. त्यामुळे आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण रस्ता दुरूस्तीच्या कामाला सुरुवात करेल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रदीप खवले यांनी अनौपचारिक चर्चेदरम्यान दिली. (जिल्हा प्रतिनिधी)गोदावरीच्या पुलाचे काम पूर्णसिरोंचा तालुक्यात तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या गोदावरी नदीच्या पुलाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे. या पुलावरून वाहतूक सुरू झाली. काही किरकोळ काम अपूर्ण आहे, ते पूर्ण केले जातील, अशी माहितीही अधीक्षक अभियंता प्रदीप खवले यांनी दिली. गडचिरोलीलगतच्या कठाणी नदीच्या पुलाचेही काम लवकरच सुरू केले जाईल. सध्या नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आहे. त्यामुळे साहित्य ठेवण्यासही अडचण आहे. पाणी कमी होताच या पुलाच्या कामाला गती दिल्या जाईल, असे त्यांनी सांगितले.