शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षित प्रवासासाठी बसचालकांच्या डोळ्यांची तपासणी केली का ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 15:56 IST

स्वतंत्र तज्ज्ञ उपलब्ध : दृष्टीदोष आढळल्यास उपचार करण्याचा सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : बसमधील सर्व प्रवाशांचा जीव बसचालकावर अवलंबून असते. त्यामुळे बसचालक शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. त्यासाठीच एसटी चालकांच्या डोळ्यांची तपासणी नियमितपणे केली जाते.

चालकाचे वय जर ४० वर्षांपेक्षा कमी असेल तर दोन वर्षातून एकदा व वय जर ४० पेक्षा अधिक असेल तर एका वर्षातून एकदा डोळ्यांची तपासणी करणे आवश्यक आहे. विभागातील चालकांच्या डोळ्यांची तपासणी करण्यासाठी मानधन तत्त्वावर एसटीने एका नेत्र तज्ज्ञाची नियुक्ती केली आहे. सदर नेत्र तज्ज्ञ चालकांची तपासणी करतात. चालकाच्या डोळ्यात काही गडबड आढळल्यास तशी माहिती एसटीला सादर केली जाते. त्यामुळे चालक त्याच्या डोळ्यातील दोष एसटी प्रशासनाकडे लपवू शकत नाही. त्यावर उपचार करावे लागतात.

दरवर्षी डोळ्यांची तपासणी होते का?चालकांच्या डोळ्ळ्यांची तपासणी करण्यासाठी एसटीने मानधन तत्त्वावर डॉक्टरची नियुक्ती केली आहे. वर्षातून एकदा डोळे तपासणी करून घेणे चालकाला सक्त्तीचे आहे.

१०० बसचालक चाळीशीनंतरचे गडचिरोली व अहेरी आगारात मिळून एकूण ३४० बसचालक आहेत. त्यापैकी १०० चालक चाळीस वर्ष वयानंतरचे आहेत. या चालकांना वर्षातून एकदा नेत्र तपासणी करणे आवश्यक आहे.

चाळीशीनंतर कोणत्या तपासण्या केल्या जातात?वयाच्या ४० वर्षानंतर नेत्र तपासणीबरोबरच बीपी, शुगर आदी सामान्य तपासण्या करून घेतल्या जातात. बीपी अधिक असल्यास चालकाची तब्येत बिघडण्याची शक्यता अधिक असते.

चालकाला दृष्टीदोष असल्यास काय ?

  • एसटी चालकाला दृष्टीदोष आढळून आल्यास त्याच्याकडून वाहन चालविण्याचे काम काढून घेतले जाते. त्याच्याकडे समकक्ष इतर पदाची जबाबदारी सोपविली जाते.
  • वर्षभराच्या कालावधीनंतर संबंधित चालकाने नेत्र तपासणीचा अहवाल एसटीकडे सादर करणे आवश्यक आहे.

"एसटी प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देते. चालकांची दृष्टी चांगली असावी, यासाठी एसटी प्रशासन नेहमी जागरूक असते. प्रत्येक चालकाला वर्षातून एकदा नेत्र तपासणी करणे आवश्यक आहे. चालकाच्या दृष्टीमध्ये काही दोष असल्यास त्यावर उपचार करण्याचा सल्ला संबंधित चालकाला दिला जातो."- फाल्गुन राखडे, आगार व्यवस्थापक, गडचिरोली 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली