शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

‘हरक्विलीन’ग्रस्त बाळ जन्मले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2016 01:57 IST

अत्यंत दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या ‘हरक्विलीन’ या आजाराने ग्रस्त बाळ गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात ३१ मे रोजी जन्माला आले.

पाच दिवस राहिले जिवंत : नागपूरच्या बाळानंतर घटना उघडकीसगडचिरोली : अत्यंत दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या ‘हरक्विलीन’ या आजाराने ग्रस्त बाळ गडचिरोली जिल्हा सामान्य रूग्णालयात ३१ मे रोजी जन्माला आले. पाच दिवस जिवंत राहिल्यानंतर सदर बाळाचा ४ जून रोजी मृत्यू झाला. मात्र नागपूर येथे अशाच आजाराच्या बाळाचा जन्म झाल्यानंतर गडचिरोली येथील या बाळाच्या जन्माची घटना १४ जून रोजी उघडकीस आली. निर्मला तिरूपती लेकूर रा. देवलमरी असे बाळाच्या आईचे नाव आहे. निर्मला ही प्रसूतीसाठी देवलमरी प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती झाली. मात्र तिला उपजिल्हा रूग्णालय अहेरी येथे रेफर करण्यात आले. तिची प्रसूती अत्यंत गुंतागुंतीची वाटल्याने तिला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती करण्यात आले. ३१ मे रोजी निर्मलाला ‘हरक्विलीन’ रोग ग्रस्त मुलगी जन्माला आली. तिची त्वचा कडक व फाटली होती. काही ठिकाणांमधून रक्त बाहेर पडत होते. बोटे अत्यंत लहान होती. चेहरा दिसायला अत्यंत विद्रुप होता. त्वचेतून रक्त बाहेर निघत असल्याने संपूर्ण बाळ लाल रंगाचे दिसत होते. गडचिरोली रूग्णालयातील प्रसूती तज्ज्ञांनी या बाळाला नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या दवाखान्यात भरती करण्याचा सल्ला दिला. मात्र निर्मला लेकूर यांची परिस्थिती हलाखीची असल्याने या बाळाला नागपूर येथे हलविण्यास नकार दिला. गडचिरोली रूग्णालयातून सुट्टी करून त्याला देवलमरी येथे स्वत:च्या गावी घेऊन गेले. गावी नेल्यानंतरही सदर बाळ पाच दिवस जीवंत होता. ४ जून रोजी त्या बाळाचा मृत्यू झाला, अशी माहिती अहेरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शिवराम कुमरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ‘हरक्विलीन’ आजाराने ग्रस्त बाळ तीन लाख बालकांमध्ये एक जन्माला येते. मात्र या विषयी येथील डॉक्टर फारसे जाणकार नसल्याने या बाळाच्या जन्माविषयीची अजिबात प्रसिद्धी झाली नाही. नागपूर येथील रूग्णालयात ११ जून रोजी ‘हरक्विलीन’ आजाराने ग्रस्त बाळ जन्माला आले. त्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रकाशित झाल्या. त्यानंतर या रोगाविषयीची माहिती येथील डॉक्टरांना मिळाली. गडचिरोली येथील एका डॉक्टराने या बाळाचा फोटो काढून ठेवला होता. मंगळवारी सदर फोटो लोकमत प्रतिनिधीला प्राप्त झाला.(नगर प्रतिनिधी)काय आहे हरक्विलीन आजार?हरक्विलीन हा अत्यंत दुर्मिळ आजार समजला जातो. एबीसीए १२ नावाच्या जीनमध्ये गडबड झाल्याने हा आजार होतो. यात त्वचा प्रभावित होते. नाक, तोंड, डोळे यांचा पूर्ण विकास होत नाही. त्वचा फाटली राहते. त्यामुळे सतत रक्त बाहेर निघते. परिणामी सदर बाळ जन्मानंतर काही दिवसातच मृत्यू पावते.