शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खोदतळी शेतीसाठी हरित संजीवनी

By admin | Updated: September 24, 2015 01:55 IST

जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी वन विभागाच्या पुढाकारातून खोदतळी खोदण्यात आली.

आरमोरी वन परिक्षेत्र : जलयुक्त शिवार योजना फळाला; शेतकऱ्यांमध्ये समाधानजोगीसाखरा : जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी वन विभागाच्या पुढाकारातून खोदतळी खोदण्यात आली. त्यामुळे मजुरांना रोजगार तर मिळालाच शिवाय पाण्याची योग्य साठवणूकही झाली. याचाच प्रत्यय आरमोरी तालुक्यातही आला. आरमोरी वन परिक्षेत्रात खोदतळी वन विभागाच्या पुढाकारातून अनेक ठिकाणी निर्माण केल्याने या भागातील शेतीसाठी हरित संजीवनी प्राप्त झाली आहे. परिणामी अनेक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आरमोरी वन परिक्षेत्रात अनेक ठिकाणी खोदतळी निर्माण करण्यात आली. नव्याने रूजू झालेले वन परिक्षेत्राधिकारी पी. आर. तांबटकर यांनी वन व वन्य प्राण्यांचे संरक्षण व्हावे, त्याबरोबरच जंगलातील वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करताना गावालगत जाऊन बळी पडण्याची वेळ येऊ नये, याकरिता जंगलात खोदतळी निर्माण करून बारमाही पाणी साठ्याची व्यवस्था केली. ठिकठिकाणी पाण्याची पातळी वाढविण्याचे पर्याय शोधण्यात आले. कर्तव्य व जबाबदारी स्वीकारून मोठ्या उत्साहाने वन परिक्षेत्रात तलावाची निर्मिती केली. तसेच शेतीसाठी पाण्याचा वापर होईल, अशी संकल्पना त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मांडली. वन परिक्षेत्रात खोदतळी निर्माण केल्याने पावसाळ्यात विविध ठिकाणी पाणी साचल्याने त्यांचे परिश्रम फळाला आले आहे. जलयुक्त शिवार योजनेतून खोदतळे निर्मिती, तलावांचे मजबुतीकरण, खोलीकरण केल्याने पाण्याच्या साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे वन परिक्षेत्रात शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)