शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागात गुरूजींचे दर्शन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 05:00 IST

शासनाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. दरम्यान शाळा, महाविद्यालय व कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी ११ जुलै २०२० रोजी काढले.

ठळक मुद्देअहेरी उपविभागातील वास्तव : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शाळा, महाविद्यालयातील प्रत्यक्ष वर्ग बंद असून ३१ जुलैपर्यंत बंद राहण्याबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत. मात्र शिक्षकशिक्षकेत्तर कर्मचाºयांना कर्तव्यावर जाणे बंधनकारक आहे. मात्र अहेरी उपविभागाच्या दुर्गम भागातील अनेक शाळांमध्ये शिक्षक जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. दुर्गम भागातील शाळा व गावांमध्ये गुरूजींचे दर्शनच होत नसल्याचे अनेक ग्रामस्थांनी सांगितले आहे.शासनाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. दरम्यान शाळा, महाविद्यालय व कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी ११ जुलै २०२० रोजी काढले. परंतु शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आवश्यक कामासाठी प्रत्यक्ष शाळा व महाविद्यालयात व मुख्यालयी कर्तव्यावर उपस्थित राहण्याचे आदेशात नमूद केले आहे. जिल्ह्याच्या दुर्गम भागातील शिक्षक अद्याप शाळेच्या गावी पोहोचले नसून जिल्हा व तालुकास्थळ तळ ठोकून बसले आहेत. त्यामुळे आदिवासी भागातील काही शाळांमध्ये मार्च महिन्यापासून गुरूजींचे दर्शनच झाले नसल्याची माहिती आहे.सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, अहेरी, कोरची व धानोरा हे तालुके दुर्गम भागात मोडत असून या तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. यावर्षीचे शैक्षणिक सत्र २६ जूनपासून सुरू झाले. मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांनी ३१ जुलैपर्यंत शाळा बंद ठेवण्याचे आदेश काढले. त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अध्ययन व अध्यापनाची प्रक्रिया सुरू आहे.दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक तेथील लोकांच्या अज्ञानी व साध्यापणाचा फायदा घेऊन शाळा बंद असल्याची माहिती पसरवून आपल्या घरीच बसले आहेत. परिणामी ग्रामीण भागातील विद्यार्थी पालकासोबत शेतावर नाईलाजाने जात आहेत. जिल्हाधिकाºयांनी सर्व शिक्षकांना मुख्यालयी राहून कर्तव्य पार पाडण्याचे आदेश दिले आहेत.मात्र जिल्हा परिषदेचे काही शिक्षक या आदेशाला हरताळ फासत असल्याचे दिसून येत आहे. अशा शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहेत.पर्यवेक्षीय यंत्रणा उदासीनजिल्हा परिषदेच्या शाळा, तेथील शिक्षणाची प्रक्रिया व इतर बाबींवर गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांची देखरेख असते. संबंधित शाळेला भेटी देऊन माहिती जाणून घेण्याची जबाबदारी या पर्यवेक्षीय यंत्रणेवर आहे. मात्र अहेरी उपविभागातील दुर्गम शाळांच्या शिक्षकांच्या देखरेखीबाबत या यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा, तालुकास्थळावरून शाळा पाहणाºया शिक्षकांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :Teacherशिक्षक