रक्तदानाने बाबासाहेबांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 01:18 AM2018-04-15T01:18:14+5:302018-04-15T01:18:14+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ जयंती निमित्त गडचिरोली शहरातील सिटी हॉस्पिटल तर्फे शनिवारी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात सुमारे १२७ रक्तदात्यांनी रक्तदान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली व्यक्त केली.

 Greetings to Babasaheb by donating blood | रक्तदानाने बाबासाहेबांना अभिवादन

रक्तदानाने बाबासाहेबांना अभिवादन

Next
ठळक मुद्दे १२७ युनिट रक्त गोळा : समाजोपयोगी उपक्रमाची प्रशंसा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ जयंती निमित्त गडचिरोली शहरातील सिटी हॉस्पिटल तर्फे शनिवारी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात सुमारे १२७ रक्तदात्यांनी रक्तदान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली व्यक्त केली.
रक्तदात्यांमध्ये डॉ. यशवंत दुर्गे, डॉ.विवेक आत्राम, डॉ. अनंत कुंभारे, डॉ. मिलिंद रामटेके, डॉ. कैलाश नगराळे, डॉ.सौरभ नागुलवार, विनय बाम्बोडे, रोहीदास राऊत, राम मेश्राम, दीपक मडके, मुनीश्वर बोरकर, माराकबोडी सरपंच पंडित मेश्राम, रुपेश सोनटक्के, मिलिंद बाम्बोडे, गुरवडा सरपंच पुरुषोत्तम रामटेके, पोलीस पाटील राजपाल खोब्रागडे, लीलाधर भरडकर, निशिकांत पापडकर, नंदू कायरकर, सुनील तिडके, निखील चरडे, पंकज घोरमोडे, तुषार चोपकार, दिलीप गोवर्धनसह अनेकांनी स्वयंस्फुर्तीने रक्तदानं करून बाबासाहेबांना मानवंदना दिली.
यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे तंत्रज्ञ येसेकर, पेद्दीवार, लोखंडे, किरण कुटे, पल्लवी, देशमुख, एजाजभाई हजर होते.

Web Title:  Greetings to Babasaheb by donating blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.