शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांचे बीडीओ विरोधात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2017 01:08 IST

धानोरा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी डी. पी. सपाटे हे असभ्य वर्तवणूक करून मानसिक त्रास देत ...

दुसरा टप्पा : २० मे पर्यंत कारवाई न झाल्यास असहकार आंदोलनाचा इशाराधानोरा : धानोरा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी डी. पी. सपाटे हे असभ्य वर्तवणूक करून मानसिक त्रास देत असल्याची तक्रार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन धानोरा शाखेच्या वतीने करण्यात आली. दरम्यान ग्रामसेवक संघटनेच्या वतीने एक दिवसीय असहकार आंदोलन गुरूवारी करण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष आर. बी. बोरकुटे, उपाध्यक्ष एस. बी. संतोषवार, सचिव एस. के. बोरकर, कार्याध्यक्ष जे. एस. मेश्राम, कोषाध्यक्ष पी. एस. बुराडे यांनी केले. यावेळी पंचायत समितीसमोर धरणेही देण्यात आले. याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात गट विकास अधिकारी डी. पी. सपाटे धानोरा पंचायत समितीमध्ये रूजू झाल्यापासून ग्रामपंचायस्तरावर काम करीत असताना अवास्तव प्रशासकीय अडचणी आणत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या विकासकामांवर व ग्रामसेवकाच्या मानसिकतेवर विपरित परिणाम झाला आहे. धानोरा तालुका दुर्गम असून ग्रामसेवक आपली जबाबदारी व कर्तव्य नियमित पार पाडत असताना बीडीओंकडून कोणतेही सहकार्य मिळत नाही. उलट एकेरी भाषेत बोलणे, कार्यवाहीची धमकी देणे आदी प्रकार मानसिक त्रास सुरू आहे व ग्रामसेवकांची आर्थिक पिळवणूकही होत आहे, असे ग्रामसेवक संघटनेने म्हटले आहे. यापुढे ३ जानेवारीपासून मासिक, पाक्षिक सभांवर बहिष्कार टाकण्यात येणार असून ग्रामपंचायतीचे कामकाज सुरू राहिल. तसेच लेखा परीक्षण, चौकशी, दप्तरी तपासणी व अहवाल देणे बंद करण्यात आले आहे. २० मे पर्यंत प्रश्न मार्गी न लागल्या सर्व योजनांचे काम बंद करून असहकार आंदोलन सुरू करण्यात येईल, अशी माहिती ग्रामसेवक संघटनेने दिली आहे. या प्रकरणी संवर्ग विकास अधिकारी डी. पी. सपाटे यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करण्यात आला. ते मिटींगमध्ये असल्याने त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे त्यांची बाजू जाणून घेता आली नाही. (तालुका प्रतिनिधी)