शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
2
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
3
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
4
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
5
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
6
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
7
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
8
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
9
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
10
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
11
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
12
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
13
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
14
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
15
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
16
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
17
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
19
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
20
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गोंडवाना विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या १० टक्के जागा वाढणार

By admin | Updated: July 24, 2015 01:32 IST

चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठात यावर्षी पदवी ...

निवेदन : चंद्रपूर एनएसयूआयच्या मागणीनंतर विद्यापीठ प्रशासनाचा निर्णय
गडचिरोली : चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठात यावर्षी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून अनेक विद्यार्थी वंचित राहिले होते. याबाबीची दखल घेऊन चंद्रपूर जिल्हा एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी गुरूवारी गोंडवाना विद्यापीठावर धडक देऊन विद्यापीठाअंतर्गत अभ्यासक्रमाच्या १० टक्के जागा वाढविण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाला घेण्यास भाग पाडले.
एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी कुशल पुगलिया यांच्या नेतृत्त्वात गोंडवाना विद्यापीठावर धडक देऊन चंद्रपूरसह गडचिरोली जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागा वाढविण्याची मागणी केली. यावेळी विद्यापीठाचे बीसीयूडीचे प्रभारी संचालक डॉ. एस. एम. रोकडे यांनी एनएसयूआयच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून या अभ्यासक्रमात १० टक्के जागा वाढवून घेण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला जाईल, असे सांगितले. त्यामुळे चालू सत्रात ५०० विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. या शिष्टमंडळात एनएसयूआयचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष स्वप्नील तिवारी, उपाध्यक्ष राहुल मानकर, शहर अध्यक्ष राजु अहीर, जिल्हा महासचिव मोन्टो मानकर, बल्लारपूर तालुकाध्यक्ष चेतन गेडाम, शहराध्यक्ष श्रीकांत आंबेकर, जिल्हा महासचिव आकाश मासिरकर यांचा समावेश होता. या शिष्टमंडळाने विद्यापीठ प्रशासनाशी चर्चा करून त्यांना पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणीची माहिती दिली व सदर अडचण दूर करण्यासाठी जागा वाढवून देण्यात याव्या, असे सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)