शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

मसेलीच्या शासकीय आश्रमशाळेला मिळाला आयएसओ दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 05:00 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोलीअंतर्गत येणाऱ्या; पण जिल्ह्यातील उत्तर टोकावर असलेल्या दुर्गम भागातील या शाळेत असलेल्या सोयी-सुविधा सध्या सर्वांसाठी कौतुकाचा विषय झाला आहे. मागील शैक्षणिक सत्रापासून शालेय व्यवस्थापन व सोयी-सुविधांबाबत मुख्याध्यापक आर.एम. पत्रे यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्यासाठी मेहनत घेतली. वेद असोसिएट नागपूरचे निरीक्षक व पर्यवेक्षक विनोद कोल्हे, रोशन महल्ले व प्रजापती यांनी मुख्याध्यापक पत्रे यांना आयएसओ नामांकनाचे प्रमाणपत्र देऊन गौरविले.

ठळक मुद्देजिल्ह्यातील पहिली शाळा, दुर्गम भागात असूनही विविध सोयी-सुविधा आणि सुशोभीकरण

लिकेश अंबादेलाेकमत न्यूज नेटवर्ककोरची : शासकीय आश्रमशाळा म्हटले की, वेगळेच आणि नकारात्मक चित्र अनेकांच्या नजरेसमोर येते. त्यातही गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त, दुर्गम भागातील आदिवासी आश्रमशाळा म्हटल्यावर तर काय हाल असतील, अशी कल्पना अनेक जण करतात; पण या कल्पनेच्या अगदी विपरीत चित्र असणारी शासकीय आश्रमशाला कोरची तालुक्यातील मसेली या गावात आहे. प्रसन्न वातावरण, शैक्षणिक व भौतिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या शाळेला आयएसओ नामांकन मिळाले आहे. हा सन्मान मिळविणारी ही गडचिरोली जिल्ह्यातील पहिली शासकीय आश्रमशाळा ठरली आहे.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोलीअंतर्गत येणाऱ्या; पण जिल्ह्यातील उत्तर टोकावर असलेल्या दुर्गम भागातील या शाळेत असलेल्या सोयी-सुविधा सध्या सर्वांसाठी कौतुकाचा विषय झाला आहे. मागील शैक्षणिक सत्रापासून शालेय व्यवस्थापन व सोयी-सुविधांबाबत मुख्याध्यापक आर.एम. पत्रे यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्यासाठी मेहनत घेतली. वेद असोसिएट नागपूरचे निरीक्षक व पर्यवेक्षक विनोद कोल्हे, रोशन महल्ले व प्रजापती यांनी मुख्याध्यापक पत्रे यांना आयएसओ नामांकनाचे प्रमाणपत्र देऊन गौरविले. याकरिता सहायक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी आशिष येरेकर यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन लाभल्याचे शिक्षकवृंद सांगतात. येथे कार्यरत शिक्षक प्रभुदास लाडे, बी.एम. चौधरी, आशिष ढबाले, शिक्षिका विशाखा सोनवणे, वीणा जांभूळकर, उषा सोनकुसळे, भारती रहांगडाले, राजलक्ष्मी ढेकवार व अधीक्षक प्रमोद तुलावी इत्यादींसह महेश यादव, अंगत कुमरे, एम.टी. मडावी, हरसिंग बोगा, देवचंद कोंडाप व सुमन बांडेबाई इत्यादी कर्मचाऱ्यांनी त्यासाठी सहकार्य केले. 

अशा आहेत आश्रमशाळेतील सुविधावेद असोसिएटच्या वतीने वेळोवेळी या शाळेचे मूल्यांकन केले. त्यामध्ये या आश्रमशाळेचे सुनियोजित व्यवस्थापन, विद्यार्थी व शिक्षकांकरिता निकषनिहाय सोयी-सुविधांची पूर्तता, शाळा सुशोभीकरण व सौंदर्यीकरण, आवश्यक व उपयुक्त सूचना फलके, कार्यालयीन दस्तऐवजांचे सुनियोजित व्यवस्थापन, वीज, पाणी, अन्नाचा नियोजनपूर्वक वापर, शाळेतील बोलक्या भिंती व संरक्षक भिंत ठेवणे, स्वागत व प्रवेश नोंदणी कक्ष, आकर्षक शालेय फुलबाग, गोंडी बोलीभाषा शब्दकोश, अभ्यासक्रमनिहाय वर्ग सजावट, डिजिटल व संगणक कक्ष, अद्ययावत प्रयोगशाळा व वाचनालय आदी बाबी या आश्रमशालेला आयएसओ नामांकन मिळवून देण्यासाठी कारणीभूत ठरल्या.

मसेलीसोबत भाडभिडी येथील आश्रमशाळेलाही आयएसओ नामांकन मिळाले आहे. याचे खरे श्रेय संबंधित मुख्याध्यापकांचेच आहे. कोणताही विशेष फंड न देता त्यांनी शाळेत विविध सुविधा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला. येत्या काळात आणखी असेच नवनवीन बदल दिसतील. भौतिक सुविधांसोबत शैक्षणिक दर्जा वाढण्याकडेही आम्ही लक्ष देणार आहोत.-आशिष येरेकर (आयएएस),प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास विभाग गडचिरोली

 

टॅग्स :Schoolशाळा