शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सत्यवानरावांच्या निधनानंतर सुरू झाला गणेशोत्सव

By admin | Updated: September 12, 2016 02:10 IST

माजी आमदार व अहेरीचे दिवंगत राजे सत्यवानराव महाराज यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी राणी रूख्मिणीदेवी यांनी राजमहल परिसरात

राजपरिवारातील सोहळा : पंचक्रोशीतील आकर्षणअहेरी : माजी आमदार व अहेरीचे दिवंगत राजे सत्यवानराव महाराज यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी राणी रूख्मिणीदेवी यांनी राजमहल परिसरात श्रीगणेशाची प्रतिष्ठापणा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून येथे श्रीगणेश उत्सवाला सुरूवात झाली. यंदा या गणेशोत्सवाचे पाचवे वर्ष आहे. गणपती विराजमान झाल्यानंतर संपूर्ण राजपरिवाराचे सदस्य सर्व धार्मिक कार्यक्रमांवर लक्ष देऊन राहतात. दररोज सकाळ व संध्याकाळची आरती स्वत: राणी रूख्मिणीदेवी व अवधेशराव यांच्या उपस्थितीत केली जाते. दररोज रात्री भजनाचा कार्यक्रमही आयोजित केला जातो. या संपूर्ण कार्यक्रमाला राणी रूख्मिणीदेवी स्वत: जातीने हजर राहून परिसरातील गावांमधून देखावे, गणेशमूर्ती पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाची व्यक्तिगत विचारपूस करतात. अनेक लोक मंडपातच मुक्कामीही राहतात. त्यांचीही सकाळी विचारपूस केल्याशिवाय राणी रूख्मिणीदेवी यांची दिनचर्या सुरू होत नाही. गणेशोत्सवाचे १० दिवस संपूर्ण राज परिवार अहेरीत राहून पार पाडतात. सकाळ व संध्याकाळी दररोज लाडूचा प्रसाद उपस्थितांना वितरित केला जातो. या कामावरही अवधेशराव स्वत: लक्ष ठेवून असतात. धार्मिक उत्सव अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. हा श्रीगणेश विराजमान झाल्यानंतर राणी रूख्मिणीदेवी यांना जिल्हा परिषद निवडणुकीत पहिल्यांदा यश मिळाले. त्यानंतर राजे अम्ब्रीशराव आत्राम विधानसभेवर निवडून गेलेत. पहिल्यांदाच त्यांना राज्यमंत्री पदही मिळाले, असे अनेकजण सांगतात. ना. अम्ब्रीशराव आत्राम कामात व्यस्त असले तरी राणी रूख्मिणीदेवी हा उत्सव सांभाळून घेतात. राजमहालातील गणेशाच्या मूर्तीची निवड, वेशभूषा, आकार व रूप कसे असले पाहिजे, याची निवड राजे अम्ब्रीशराव महाराज व अवधेशराव यांनी केली होती. फुलांचा हार, गणेश सजावट व मंदिर सजावटीकडे अवधेशराव स्वत: लक्ष देतात. (तालुका प्रतिनिधी)