शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 20:29 IST

गडचिरोलीच्या दोन गावांमध्ये 'कुर्मा घर' बंद करून महिलांसाठी सुरक्षित ‘विश्रांती गृह’ उभारण्यात आले आहे.

गडचिरोलीच्या आदिवासी भागात महिलांना मासिक पाळीच्या काळात सामाजिक अलिप्ततेला सामोरे जावे लागते. या काळात त्यांना 'कुर्मा घर' नावाच्या अत्यंत असुरक्षित झोपडीवजा घरात राहावे लागत होते. मात्र, गोडालवाही आणि कुपनेर या दोन गावांनी या प्रथेवर पूर्णविराम दिला आहे. या गावांमध्ये आता पारंपरिक, असुरक्षित 'कुर्मा घरां'ऐवजी आता महिलांसाठी सुरक्षित आणि पर्यावरणपूरक ‘पॉझिटिव्ह विश्रांती गृह’ उभारण्यात आले आहे.

'युवा परिवर्तन' आणि 'टाइम अँड टॅलेंट्स क्लब' या दोन सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे हा बदल शक्य झाला आहे. या संस्थांच्या सहकार्याने या गावांमध्ये महिलांसाठी सुरक्षित विश्रांती गृह बांधण्यात आले आहे.

सुरक्षिततेसह पर्यावरणपूरक जागा!गोडालवाही गावाची लोकसंख्या २३५ असून, यातील ३७ महिलांना मासिक पाळी येते. तर, कुपनेर या गावाची लोकसंख्या ०५ असून यात, ३५ महिला पाळी वयीन आहेत. या गावांमध्ये प्रत्येकी २६१ चौरस फूट क्षेत्रफळाची  बांधण्यात आली आहेत. 

विश्रांती गृहांमध्ये काय आहे खास?

महिलांसाठी बनवलेल्या या ‘पॉझिटिव्ह विश्रांती गृहां’मध्ये इको-ब्रिक्सपासून बनवलेली पलंग, धूरविरहित चूल व जाळीदार खिडक्या, सौर दिवे आणि थर्मोकोलसह स्टील छप्पर, स्वच्छ बाथरूम व टॉयलेट, वॉशबेसिन, कपडे सुकवण्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे.

इको-ब्रिक्स म्हणजे काय?या गृहांची खासियत म्हणजे बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या इको-ब्रिक्स प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये माती भरून तयार केल्या आहेत. हे घटक केवळ पर्यावरणपूरक नाहीत, तर बांधकामालाही मजबूत बनवतात.

महिलांच्या सन्मानासाठी एक ठोस पाऊल!या उपक्रमाबद्दल बोलताना ‘युवा परिवर्तन’चे प्रतिनिधी म्हणाले की, "हे केवळ एक वास्तूप्रकल्प नाही, तर महिलांच्या आरोग्य, सन्मान आणि पर्यावरणीय जाणीवेच्या दिशेने उचललेलं एक सकारात्मक पाऊल आहे." या उपक्रमामुळे स्थानिक महिलांना मासिक पाळीच्या काळात सुरक्षित, स्वच्छ जागा मिळाली आहे.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीMenstrual Healthमासिक पाळी आणि आरोग्य