शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

खंजेरी भजनाच्या नादमय स्वरांनी गडचिरोलीकर मंत्रमुग्ध

By admin | Updated: January 25, 2016 01:45 IST

नवकिर्ती दुर्गा उत्सव मंडळ व जनजागृती गणेश मंडळ गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने येथील कमल-केशव सभागृहात

गडचिरोली : नवकिर्ती दुर्गा उत्सव मंडळ व जनजागृती गणेश मंडळ गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने येथील कमल-केशव सभागृहात शनिवारपासून विदर्भस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. शनिवारपासून तर आज सायंकाळपर्यंत यवतमाळ, अमरावती, वाशिम, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील १४ भजन मंडळांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत भजन मंडळांनी सादर केलेल्या खंजेरी भजनाच्या नादमय स्वरांनी गडचिरोलीकर मंत्रमुग्ध झाले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या १४ मंडळांमध्ये नऊ पुरूष भजन मंडळ, चार महिला भजन मंडळ व एका बाल भजन मंडळाचा समावेश आहे. या १४ भजन मंडळांनी स्पर्धेतील अटी व नियमानुसार देशभक्तीवर दोन तर व्यसनमुक्ती, अध्यात्म व गवळण असे पाच भजन सादर केले. एका भजन मंडळात पाच लोक व दोन वाजंत्री असा सात लोकांचा समुह होता. यावेळी सहभागी झालेल्या भजन मंडळांनी वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संदेशावर तसेच व्यसनमुक्ती, स्वच्छता अध्यात्म व देशभक्तीपर उत्कृष्ट भजन सादर केले. या भजन स्पर्धेमुळे चामोर्शी मार्गावरील परिसर भक्तीमय झाला. रविवारी रात्री ७ वाजता नागपूर येथील बाल कीर्तनकार गौरी विठोले यांनी कीर्तनातून समाजप्रबोधन केले. यावेळी गडचिरोली शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय व त्यापुढील क्रमांक पटकाविणाऱ्या विजेत्या भजन मंडळींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख, पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)