शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कौतुकास्पद! गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली शेतात जावून भात रोवणी, उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांना दिला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 17:58 IST

Gadchiroli District Collector News: साखरा या गावात कृषी विभागाच्या वतीने युवराज उंदीरवाडे यांच्या शेतात रोवणी कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी सिंगला यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

गडचिरोली : जिल्ह्यात दमदार पावसानंतर सर्वच शेतकऱ्यांनी भात रोवणीला सुरूवात केली असताना जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनीही साखरा गावातील एका शेतात जावून प्रत्यक्ष भात रोवणीचा अनुभव घेतला. (Gadchiroli District Collector appeals to farmers to focus on mechanization to increase paddy planting yield)

साखरा या गावात कृषी विभागाच्या वतीने युवराज उंदीरवाडे यांच्या शेतात रोवणी कार्यक्रमाचा जिल्हाधिकारी सिंगला यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बांधावर जावून त्यांना प्रोत्साहन दिले. शेतीमधील उत्पन्न वाढीसाठी आता यांत्रिकीकरण स्विकारले पाहिजे, असे आवाहन शेतकऱ्यांना केले. परंपरागत शेतीमध्ये खूप मेहनत घ्यावी लागते. उत्पन्नही काही अंशी कमी राहते. यातून बाहेर पडून शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करावी, जेणेकरून उत्पन्न वाढेल आणि मेहनतही कमी करावी लागेल असे सांगितले.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, नाबार्डचे जिल्हा प्रमुख राजेंद्र चौधरी, कृषी अधिकारी अरुण वसवाडे, बालाजी कदम, पी.पी.वाहने आणि स्थानिक शेतकरी उपस्थित होते. 

शेतकऱ्यांसाठी येणार पेरणी यंत्रकृषी विभागाकडून मानव विकास मिशनमधून ट्रॅक्टर वाटप व आवश्यक इतर सयंत्र वाटप केले जात आहे. यातून शेतीमधील उत्पन्न वाढीबरोबरच इतर ताणही कमी होणार असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी बोलताना म्हणाले. येत्या काळात जिल्ह्यातील रबी हंगामातील पेरणी क्षेत्र वाढविण्यासाठीही उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यांत्रिकीकरण योजनेत जिल्ह्यात ४० पेरणी यंत्र घेण्यात येत आहेत. त्यातून किमान प्रतीमशीन १०० एकर क्षेत्र पेरून यांत्रिकीकरणाला चालना दिली जाणार आहे.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीagricultureशेतीGovernmentसरकार